मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये प्रकल्प अभियंता पदांसाठी भरती सुरू, पगार 1,40,000 रुपये

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये प्रकल्प अभियंता पदांसाठी भरती सुरू, पगार 1,40,000 रुपये

Indian Railway job: भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेच्या या विभागाच्या देखभालीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रिया राबवते. आताही  रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने (Mumbai Railway Development Corporation Limited) काही पदांसाठी नवीन भरती प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत, प्रकल्प अभियंता सिव्हिल या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवार http://www.mrvc या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

मुंबई रेल्वे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (MRVC) भरती मंडळ  मुंबई यांनी ऑगस्ट 2023 च्या जाहिरातीमध्ये एकूण 20 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. उमेदवारांना बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह थेट मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आदी तपशील नोटिफिकेशनमध्ये दिला आहे.

या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांना त्यांच्या पात्रता/ संबंधित क्षेत्रातील अनुभवाच्या आधारावर मुलाखतीसाठी निवडले जाईल.

पदाचे नाव – प्रकल्प अभियंता – सिव्हिल.

एकूण रिक्त पदे – 20

नोकरीचे ठिकाण – मुंबई.

वयोमर्यादा –
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्जाची पद्धत – ऑनलाइन.

टी-20 क्रिकेट ठरतोय वन डेसाठी कर्दनकाळ, गेल्या पाच वर्षात 500% वाढले टी-20 सामने
पगार –
40,000 – 1,40,000 रुपये

निवड प्रक्रिया –
अर्ज केलेल्या उमदेवारांची निवड ही थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.

मुलाखतीची तारीख –
25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2023

मुलाखतीचा पत्ता
व्यवस्थापक (HR), मुंबई रेल्वे विकास निगम लिमिटेड, दुसरा मजला, चर्चगेट स्टेशन बिल्डिंग, चर्चगेट, मुंबई-400020.

अधिकृत वेबसाइट –
https://mrvc.indianrailways.gov.in/uploads/PE%20Advertisement.pdf

शैक्षणिक पात्रता-
मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा ६०% पेक्षा जास्त गुणांसह समतुल्य.

जाहिरात –
https://mrvcIndianrailways.gov.in/uploads/PE%20Advertisement.pdf

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube