सारखे नाव असणाऱ्यांना निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
Lok Sabha Election 2024 : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) वारे वाहत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघात एकसारखे नाव असणारे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. यामुळे एकसारखे नाव असणाऱ्या उमेदवारांना निवडणूक लढण्याबाबत बंधने आणण्यासाठी सर्वोच्च न्यायलयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली होती.
या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायलयात न्यायमूर्ती बीआर गवई ( B. R. Gawai) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणात सुनावणी करताना, जर एखाद्याच्या आई- वडिलांनी त्यांचे नाव राहुल गांधी (Rahul Gandhi) किंवा लालू यादव ठेवले असेल तर त्या आधारावर त्यांना निवडणूक लढण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, त्यामुळे त्यांच्या अधिकारांवर परिणाम होत नाही का? असा प्रश्न विचारात खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. साबू स्टीफन यांनी या प्रकरणात याचिका दाखल केली होती.
तर याचिकाकर्त्यांनी आपली बाजू मांडताना म्हटले होते की, आम्ही निवडणूक आयोगाचे दोन अहवाल पाहिल्यानंतर या मुद्द्याचे परीक्षण केले आहे. निवडणूक नियम 1961 मधील नियम 22 (3) नुसार, दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांचे सारखे नाव असेल तर त्यांना त्यांचा व्यवसाय किंवा निवास्थान किंवा अन्य पर्याय जोडून ओळखले जाईल.
राज्यात 202 साखर कारखाने होते मात्र आज 101 का राहिली ? उत्तर द्या, अमित शहांचा शरद पवारांना सवाल
मात्र न्यायालायने ही याचिका फेटाळून लावली. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासह देशातील अनेक मतदारसंघात एकसारखे नाव असणाऱ्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
मोठी बातमी! कल्याणमध्ये ठाकरे बदलणार उमेदवार? माजी महापौरांचा अर्ज दाखल