ठरलं तर..! रायबरेलीतून राहुल गांधी लोकसभेच्या रिंगणात; अमेठीतही उमेदवार ठरला

ठरलं तर..! रायबरेलीतून राहुल गांधी लोकसभेच्या रिंगणात; अमेठीतही उमेदवार ठरला

Rahul Gandhi Rae Bareli Lok Sabha : काँग्रेसने (Congress) मोठा निर्णय घेत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना रायबरेली लोकसभा मतदारसंघातून (Rae Bareli Lok Sabha) उमेदवारी जाहीर केली आहे. रायबरेलीतून सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या जागी राहुल गांधी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे आता रायबरेली लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी विरुद्ध दिनेश प्रताप सिंह अशी लढत होणार आहे. 2004 ते 2024 पर्यंत सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होत्या.

राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रायबरेली लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांना उमेदवारी जाहीर होणार असल्याची चर्चा होती. यामुळे या मतदारसंघात काँग्रेस पुन्हा एकदा बाजी मारणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. माहितीनुसार, राहुल गांधी लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. रायबरेली लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढली होती. परंतु, भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला होता. राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून मात्र विजयी झाले होते. आता त्यांनी पुन्हा आपल्या पारंपारिक मतदारसंघाकडे मोर्चा वळवला आहे. यंदा त्यांनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघाची निवड केली आहे. या मतदारसंघासाठी काँग्रेसने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

Rahul Gandhi : अदानींच्या फायद्यासाठी ‘अग्निवीर’चा घाट; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

तसेच पक्षाने अमेठीतील उमेदवारही निश्चित केला आहे. काँग्रेस पक्षाने अमेठी लोकसभा मतदारसंघातून किशोरी लाल शर्मा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. येथे त्यांचा सामना भाजप  नेत्या स्मृती इराणी यांच्याशी होणार आहे. या दोन्ही मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत सस्पेन्स कायम होता. अखेर हा सस्पेन्स मिटवत काँग्रेसने येथे उमेदवारी जाहीर केली. आता लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील या मतदारसंघात पुन्हा गांधी परिवारातील व्यक्ती दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज