मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी, नियम मोडल्यास कडक कारवाई

मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी, नियम मोडल्यास कडक कारवाई

4th phase of Lok Sabha elections : लोकसभेचा चौथा टप्पा उद्या होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. पुणे लोकसभेसाठी उद्या मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. (Loksabha Election)  आदेशांचा भंग केल्यास कारवाई करण्याचा इशारा सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे.

 

परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

पुणे लोकसभा मतदारसंघात सर्व मिळून दोन हजार 18 मतदान केंद्र असणार आहेत. तसंच, शिरूर लोकसभा मतदारसंघातील काही भागाचा समावेश पुणे पोलीस आयुक्तालयात होते. त्यामुळे पुणे पोलिसांकडून शिरुर लोकसभा मतदारसंघात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

 

नियम सर्वांना लागू

याबरोबरच निवडणून आयोगाच्या नियमानुसार मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात कोणत्याही प्रकारचं छायाचित्रण करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच, ज्वलनशील वस्तू, शस्त्र बाळण्यासही मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर यातील सर्व आदेश उमेदवारांसह त्यांच्या प्रतिनिधींना आणि मतदारांनाही लागू राहणार आहेत.

 

बापट यांचे निधन झाले

पुणे लोकसभा मतदारसंघातील 2024 उमेदवारांच्या यादीनुसार, भारतीय जनता पक्षाकडून मुरलीधर किसन मोहोळ आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रवींद्र हेमराज धंगेकर हे प्रमुख उमेदवार आहेत. मागे  2014 मध्ये  मोदी लाटेत अनिल शिरोळे यांनी कांग्रेसचे डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांना पाडले. अनिल शिरोळे यांनी 3,15,769 मतांनी निवडणूक जिंकली. त्यांना  5,69,825 मते तर डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांना 2,54,056 मते मिळाली. साल 2019 मध्ये गिरीश बापट यांना 6,32,835 मते मिळून ते जिंकले. गिरीश बापट यांनी 3,24,628 मतांनी आघाडी घेतली. तर त्यांच्या विरोधात कांग्रेसच्या  मोहन जोशी यांना 3,08,207 मते मिळाली. पुढे 29 मार्च 2023 रोजी गिरीश बापट यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज