चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या! भाजपसाठी महत्त्वाचा टप्पा, अनेक ठिकाणी ‘टफ फाइट’

चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या! भाजपसाठी महत्त्वाचा टप्पा, अनेक ठिकाणी ‘टफ फाइट’

Lok Sabha Election 2024 Fourth Phase : देशभरात लोकसभेच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. देशभरात एकून 7 टप्प्यामध्ये निवडणुका होत असून महाराष्ट्रात 5 टप्यांत निडणुका होत आहेत. त्यातील चौथा टप्पा 13 मे रोजी रोत आहे. (Campaigning ) या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडवल्या आहेत. (Lok Sabha Election ) सर्वच रजकीय पक्षांकडून सुरू असलेला प्रचार आणि नेत्यांची एकमेकांवरती होत असलेल्या आरोपांच्या फैरी आज थंडावल्या आहेत. शेवटच्या दिवशी पावसाचे वातावरण असताना महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांना तुफान टोलेबाजी केली.

 

चौथ्या टप्यातील महत्वाच्या लढती.

यामध्ये बीड लोकसभेत स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या भाजप नेत्या पंकजा मुंडे महायुतीकडून आहेत. तर त्यांच्या विरोधात बीड राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे मैदानात आहेत. दुसरीकडे मोठा राजकीय वारसा असलेले डॉ. सुजय विखे अहमदनगर दक्षिणमधून महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंकेंनी दंड थोपटले आहेत. तसंच, छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या मैदानात गेली अनेक दिवसांपासून बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक म्हणून एकत्र असलेले शिलेदार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. येथे महायुतीकडून मंत्री संदिपान भुमरे आहेत तर महाविकास आघाडीकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे आहेत. तर, जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा लोकसभेत गेलेले रावसाहेब दानवे महायुतीकडून सहाव्यांदा मैदानात आहेत. तर शिरुर लोकसभा मतदारसंघही अजित पवार यांनी प्रतिष्ठेचे केला आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होत. पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी लढत होत आहे. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराच्या शेवटी सभा घेतल्या आहेत. रावेर मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील यांच्यात लढत होत आहे. जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध करण पवार यांच्यात लढत होत आहे. जालना मतदारसंघात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेविरुद्ध महाआघाडीचे डॉ. कल्याण अशी लढत होत आहे.

 

पंतप्रधान मोदींच्या कुठं सभा झाल्या

मोदींचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातल्या 5 जागांसाठी मतदान पार पडलं. यात मोदींनी चंद्रपूर, रामटेक आणि वर्ध्यात सभा घेतल्या. दुस-या टप्प्यासाठी मोदींनी नांदेड, परभणी, अमरावतीत सभा घेतल्या. पुणे, सोलापूर आणि साताऱ्यातही सभा झाल्या. तसंच, बीड माळशिरस, माढा, धाराशिव आणि लातूरमध्ये सभा झाल्या.सोमवारी अकरा ठिकाणी मतदान होत आहे. त्यातील बीड, अहमदनगर, नंदुरबार या तीन मतदारसंघात मोदींच्या नुकत्याच सभा झाल्या आहेत.

या टप्प्यात महायुतीतील सात जागा या भाजपच्या आहेत. तर तीन जागा या शिंदे सेनेच्या आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची शिरुर जागा आहे. सात जागेवर भाजपचे खासदार होते. त्यात जळगाव, बीडचे उमेदवार भाजपने बदलून दिले आहेत. पुण्याची जागा गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त होती. नंदुरबारला हिना गावीत, जालन्यातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अहमदनगरमधून सुजय विखे, रावेरमधून रक्षा खडसे हे विद्यमान खासदार आहेत.

 

चौथा टप्पा 13 मे राज्यात कुठं-कुठं मतदान होणार

  • नंदूरबार
  • जळगाव
  • रावेर
  • जालना
  • छत्रपती
  • संभाजीनगर
  • मावळ
  • पुणे
  • शिरुर
  • अहमदनगर
  • शिर्डी
  • बीड

 

चौथा टप्पा, 13 मे ला देशात कुठ-कुठ मतदान होणार

  • आंध्रप्रदेश
  • बिहार
  • झारखंड
  • मध्यप्रदेश
  • महाराष्ट्र
  • ओडिशा
  • तेलंगणा
  • उत्तरप्रदेश
  • पश्चिम बंगाल
  • जम्मू
  • काश्मीरमधील एकूण 96 जागांवर मतदान होणार आहे.

 

लोकसभेचं सात टप्प्यांतील वेळापत्रक

 

  • पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल.
  • दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल.
  • तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल.
  • चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल.
  • पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल.
  • सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल.
  • सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube