Download App

संधी होती घालवली, एकही देश भारताच्या बाजूने नाही; अरविंद सावंतांचा मोदींवर हल्लाबोल

Arvind Sawant On Operation Sindoor : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजपासून ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) चर्चा सुरु झाली

  • Written By: Last Updated:

Arvind Sawant On Operation Sindoor : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजपासून ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) चर्चा सुरु झाली असून या चर्चेत सहभाग घेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जर मोदींनी इंदिरा गांधीप्रमाणे पाकिस्तानचे (Pakistan) तुकडे केले असते तर त्यांना आम्ही डोक्यावर घेऊन नाचलो असतो असं या चर्चेदरम्यान खासदार अरविंद सावंत म्हणाले. लोकसभेत आजपासून 16 तास ऑपरेश सिंदूरवर चर्चा होणार आहे. या चर्चेत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभाग घेणार आहे.

या चर्चेदरम्यान बोलताना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, ऑपरेश सिंदूरनंतर पंतप्रधान मोदी यांनी टेलिप्रॉम्टरचा वापर करुन बिहारमध्ये इंग्रजीमध्ये भाषण केलं हे जगाला दाखवण्यासाठी होतं का? तिकडे दहशतवादी मोकाट सुटले असताना यांनी इकडे ढोल बडवायला सुरुवात केली. पंतप्रधान मोदी अजून देखील पहलगामला गेले नाहीत, मणिपूरला गेले नाही त्यांच्या संवेदना कुठे आहेत? असा सवाल खासदार सावंत यांनी लोकसभेत उपस्थित केला.

मोदींच्या सोबत जगातील एकही राष्ट्र उभं राहिलं नाही

पुढे खासदार सावंत म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर मोदींसोबत जगातील एकही राष्ट्र उभं राहिलं नाही हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं दुर्दैव आहे. जो इराण आपल्याला उधारीवर आणि रुपयांच्या बदल्यात तेल देतो त्या देशाशीही आपले संबंध बिघडले आहे. सार्क देशातील एकही देश आपल्या सोबत नाही. पाकिस्तानसोबत चीन, अमेरिका, तुर्कस्थान आणि इतर देश उभे राहिले हे कशामुळे? असं देखील खासदार सावंत म्हणाले.

तसेच पाकिस्तानला कर्ज देऊ नये यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे आपण विरोध केला होता मात्र तरीही देखील पाकिस्तानला पैसै मिळाले. त्यावरुन भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि यूएनमध्ये काय स्थिती आहे हे दिसून आले हे सगळं मोदींमुळे झालंं असा आरोप देखील खासदार सावंत यांनी केला.

माघार का घेतला?

पहलगाम हल्लानंतर संपूर्ण देश पाकिस्तानविरोधात उभे होतं. मोदींनी अनेक शिष्टमंडळ इतर देशात पाठवले पण त्याचा फायदा झाला का? एकाही देशाने भारताला उघड पाठिंबा दिला नाही याचं दु:ख वाटतंय. पाकव्याप्त काश्मीर जिंकण्याची संधी आपल्याकडे होती. ज्या पद्धतीने इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला त्याचप्रमाणे धडा शिकवण्याची संधी आपल्याकडे होती. तुम्ही जर तसं केलं असतं तरी आम्ही मोदींना डोक्यावर घेऊन नाचलो असतो पण तुम्ही संधी घालवली. अशी टीका देखील शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारवर केली.

Operation Sindoor : 21 पैकी 9 च टार्गेट, किती विमाने पाडली? काँग्रेस खासदार गौरव गोगोई भडकले 

follow us