Pak vs Ban : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, बांगलादेशने मालिका जिंकली

Pak vs Ban : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, बांगलादेशने मालिका जिंकली

Pak vs Ban : बांगलादेश आणि पाकिस्तान (Pak vs Ban) दरम्यान सुरु असणाऱ्या तीन टी-20 मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा 8 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह बांगलादेशने या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेचा तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना 24 जुलैला ढाका येथे खेळला जाणार आहे.

शेरे-ए- बांगला स्टेडियमवर (Sher-e-Bangla National Stadium) झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तान संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाची सुरुवात फारच खराब झाली होती. अवघ्या 28 धावांवर बांग्लादेश संघाने 4 विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर जाकीर अली (Zakir Ali) आणि मेहदी हसनने शानदार फलंदाजी करत बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 133 धावांपर्यंत नेले.

बांगलादेशकडून जाकीर अलीने 55 आणि मेहदी हसनने 33 धावा केल्या तर पाकिस्तानकडून सलमान मिरजा, अब्बास आफ्रिदी आणि अहमद दानियालने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

तर दुसरीकडे 134 धावांचा पाठालाग करताना पाकिस्तानने अवघ्या 15 धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या मात्र यानंतर पाकिस्तानकडून फहीम अश्रफ, अब्बास आफ्रिदी आणि अहमद दानियालने फलंदाजी करत संघाला 100 धावांच्या पार नेले. फहीमने 51 तर अब्बासने 19 धावा केल्या. अब्बास आफ्रिदीने फहीमसोबत आठव्या विकेटसाठी 41 धावा जोडल्या. शेवटच्या षटकात पाकिस्तानला 13 धावांची आवश्यकता होती. बांगलादेशच्या गोलंदाजांनी, विशेषतः महेदी हसन, मुस्तफिजुर रहमान आणि शोरीफुल इस्लाम यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्यांच्या संघाला विजय मिळवून दिला.

52 लाख मतदारांची नावं हटवली; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

अहमद दानियलने षटकाची सुरुवात चौकाराने केली परंतु दुसऱ्याच चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. या सामन्यात पाकिस्तान संघाचा टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरला. स्टार फलंदाज सैम अय्यूब, फखर जमान, मोहम्मद हरिस या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube