१५ रुपये तिकीट तरीही चाहत्यांचा दुष्काळ; दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
PAK vs BAN Test Series : पाकिस्तान क्रिकेटमध्ये प्रत्येक (Pakistan Cricket) दिवस नवीन डोकेदुखी घेऊनच उगवत असतो. पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics) स्पर्धेच्या काळात क्रिकेटची चर्चा फार होत नव्हती परंतु आता पुन्हा क्रिकेटच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेश (PAK vs BAN) यांच्यातील कसोटी मालिका अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अशी पलटी मारली आहे की आता संघाला प्रेक्षकांविनाच हा सामना खेळावा लागणार आहे.
15 रुपयांच तिकीट, निर्णय बदलला
पाकिस्तान आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यात येत्या 21 ऑगस्टपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. मालिकेतील पाहिला सामना 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान रावळपिंडी शहरात होणार आहे. यानंतर 30 ऑगस्टपासून दुसरा सामना कारची शहरात (Karachi City) होणार आहे. पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील अनेक सामने रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आले होते. प्रेक्षक येत नसल्याने क्रिकेट बोर्डासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. आता पुन्हा अशी फजिती होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून कसोटी सामन्याचे तिकीट 50 पाकिस्तानी रुपये (15 भारतीय रुपये) निश्चित केले होते. आता मात्र बोर्डाने हा निर्णय देखील बदलला आहे.
Pakistan : पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा चीन दौरा; दोन्ही देशांत नक्की काय शिजतंय?
सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांची संख्या वाढावी म्हणून बोर्डाने हा निर्णय घेतला होता आता मात्र बोर्डानेच पलटी मारत हा सामना प्रेक्षकांविनाच होणार असल्याची घोषणा केली आहे. बोर्डाच्या या निर्णयामागचं कारण देखील खास आहे. खरं तर पीसीबीने हा सामना क्लोज डोर म्हणजेच प्रेक्षकांविनाच आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अशासाठी घेतला आहे की स्टेडियममध्ये नूतनीकरणाची देखभाल दुरुस्तीची काम सुरू आहेत. हे काम पुढील वर्षात पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy 2025) केले जात आहे. अशात प्रेक्षकांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
सामन्यासाठी खरंच प्रेक्षक नाहीत?
स्टेडियममध्ये तर काम खूप दिवसांपासून सुरू आहे. तर मग प्रेक्षकांना येथे येण्याची परवानगी न देण्याचा निर्णय का घेतला गेला. त्यांच्या पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात आली नाही का की स्टेडियममधील काम प्रेक्षकांसाठी धोक्याची ठरू शकतात. किंवा तिकीटाची किंमत कमी केल्यानंतरही पेक्षक मिळत नाहीत हे कारण यामागे आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान आता तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. ज्या प्रेक्षकांनी तिकीट खरेदी केले आहे त्यांना त्यांचे पैसे पुन्हा परत करण्यात येणार आहेत.