Bangladesh Riots : विद्यार्थी अडकले, सरकारचं मोठं पाऊल, परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क
Bangladesh Riots : बांग्लादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मोठा हिंसाचार (Bangladesh Riots) घडत आहे. या पार्श्वभूमीवर बांग्लादेशात असलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm eknath Shinde) यांनी मोठं पाऊल उचललंय. बांग्लादेशातील भारतीय दुतावासाशी संपर्क करुन विद्यार्थ्यांना तत्काळ मदत देण्याबाबतच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडू देण्यात आलीयं.
बांगलादेशातील नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.
या विद्यार्थ्यांना तातडीची मदत उपलब्ध होणे आणि त्यांची भारतात…— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 6, 2024
बांग्लादेशात सध्या अशांततेचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शक्य असलेली मदत देण्यात यावी, त्यांची सुरक्षितता निश्चित करावी, शक्य होईल तेवढ्या लवकर त्यांना भारतात सुरक्षित पाठवण्याची प्रक्रिया जलगतीने करण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट मंत्रालयाशी चर्चा केलीयं. तसेच बांग्लादेशात विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असून अशा परिस्थितीत आम्ही कुटुंबियांच्यासोबत सक्षम उभं असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलंय.
‘बोलघेवड्या पुढाऱ्यांच्या टीकेला मी घाबरत नाही’; विखे पाटलांनी मविआ नेत्यांना हिशोबच सांगितला
पथकाची स्थापना
बांग्लादेशात असलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची यादी परराष्ट्र मंत्रालयाला उपलब्ध करुन देण्यात आली असून विद्यार्थ्यांशी तत्काळ संवाद साधण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने एक पथक स्थापन करण्यात आलं आहे. पथक आणि बांग्लादेशातील भारतीय दुतावास यांच्या समन्वयाने काम सुरु असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय.
दरम्यान, बांग्लादेशात सध्या हिंसाचार अन् जाळपोळीचा आगडोंब उसळला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देत देश सोडला. सैन्याने देशाचा कारभार हाती घेतला आहे. तरी देखील हिंसाचार थांबलेला नाही. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाची कार्यालयं, नेत्यांची घरे आणि हॉटेल्सना आगी लावल्या जात आहेत. इतकेच नाही तर उन्मादी जमावाने शेख हसीना यांच्या घरात घुसून लुटालूट केली आहे.