आठ हजार विद्यार्थी परतले, बांग्लादेशवर नजर पण.. सर्वपक्षीय बैठकीत सरकारचा खुलासा

आठ हजार विद्यार्थी परतले, बांग्लादेशवर नजर पण.. सर्वपक्षीय बैठकीत सरकारचा खुलासा

NDA Government Opposition Parties Meeting on Bangladesh Crisis : बांग्लादेशात सध्या हिंसाचार अन् जाळपोळीचा (Bangladesh Violence) आगडोंब उसळला आहे. पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी राजीनामा देत देश सोडला. सैन्याने देशाचा कारभार हाती घेतला आहे. तरी देखील हिंसाचार थांबलेला नाही. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाची कार्यालयं, नेत्यांची घरे आणि हॉटेल्सना आगी लावल्या जात आहेत. इतकेच नाही तर उन्मादी जमावाने शेख हसीना यांच्या घरात घुसून लुटालूट केली आहे. या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि केंद्र सरकारने आतापर्यंत काय कार्यवाही केली याची माहिती देण्यासाठी आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती.

हुकूमशाही करणाऱ्यांना जनतेची माफी नाही, बांग्लादेशचा उल्लेख करत राऊतांचा सरकारला टोला

बांग्लादेशात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर भारत सरकार अत्यंत बारकाईने नजर ठेऊन आहे. सध्या बांग्लादेशात 12 ते 13 हजार भारतीय आहेत. देशातील परिस्थिती इतकी खराब झालेली नाही की या लोकांना भारतात आणण्याची गरज पडेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने या बैठकीत सांगितले की बांग्लादेशात जी काही स्थिती असेल त्याची माहिती विरोधी पक्षांना दिली जाईल. आता या देशातून आठ हजार भारतीय विद्यार्थी देशात परतले आहेत. बाकीच्या लोकांना आताच तेथून बाहेर काढण्याची गरज नाही. शेख हसीना यांच्याबाबतीतही अजून काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही. यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही सरकारकडून होत असलेल्या कार्यवाहीवर समाधान व्यक्त करण्यात आले.

या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सरकारची बाजू मांडली. बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पार्टीचे खासदार रामगोपाल यादव आदींसह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. बैठकीनंतर एस. जयशंकर यांनी ट्विट करत माहिती दिली. या बाबतीत विरोधी पक्षांनी समर्थन दिल्यान मंत्री जयशंकर यांनी समाधान व्यक्त केले.

बांग्लादेशातील हिंसाचारात भारतीय कंपन्या संकटात; LIC ने घेतला मोठा निर्णय

बांग्लादेशी अराजकांत विदेशी शक्तींचा हात आहे का : राहुल गांधी

या बैठकीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बांग्लादेशातील सध्याच्या परिस्थितीत विदेशी शक्तींचा हात आहे का? या परिस्थितीचा विचार करता काही दीर्घकाळाचा प्लॅन सरकारने केला आहे का? असे प्रश्न विचारले. विरोधी पक्षांच्या अन्य नेत्यांनीही सरकारला काही प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरे सरकारकडून देण्यात आली. यानंतर सरकारकडून होत असलेल्या कार्यवाहीवर समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच या मुद्द्यावर आम्ही सरकारसोबत आहोत असेही या नेत्यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube