“हुकूमशाही करणाऱ्यांना जनतेची माफी नाही”; बांग्लादेशचा उल्लेख करत राऊतांचा सरकारला टोला

“हुकूमशाही करणाऱ्यांना जनतेची माफी नाही”; बांग्लादेशचा उल्लेख करत राऊतांचा सरकारला टोला

Sanjay Raut on Bangladesh Violence : बांग्लादेशात सध्या हिंसाचार अन् जाळपोळीचा (Bangladesh Violence) आगडोंब उसळला आहे. पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी राजीनामा देत देश सोडला. सैन्याने देशाचा कारभार हाती घेतला आहे. तरी देखील हिंसाचार थांबलेला नाही. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाची कार्यालयं, नेत्यांची घरे आणि हॉटेल्सना आगी लावल्या जात आहेत. इतकेच नाही तर उन्मादी जमावाने शेख हसीना यांच्या घरात घुसून लुटालूट केली आहे. या भयावह परिस्थितीवर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत.

भारत सरकारही प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. अशी परिस्थिती असताना विरोधी पक्षांनी सरकावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. बांग्लादेशातील या परिस्थितीचा (Bangladesh Crisis) उल्लेख करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. देशात हुकूमशाही करणाऱ्यांना जनता माफ करत नाही, असा टोला त्यांनी सरकारला लगावला.

मोठी बातमी! बांग्लादेशातील हिंसाचाराच्या भारतालाही झळा; ‘या’ राज्यात नाईट कर्फ्यू

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना बांग्लादेशातील परिस्थितीबाबत विचारलं. त्यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी केंद्र सरकावर खोचक टीका केली. राऊत म्हणाले, पंतप्रधान म्हणून शेख हसीना अपयशी ठरल्या. लोकशाहीच्या माळा जपत त्यांनी हुकूमशाही पद्धतीने देश चालवला. शेख हसीना यांच्याबद्दल इतकंच सांगता येईल की त्यांनी लोकशाहीचा मुखवटा घालून हुकूमशाही केली. लोकशाहीच्या नावाखाली कुणी जर देशात हुकूमशाही चालवत असेल तर जनता त्यांना माफ करत नाही.

बांग्लादेशातही भारतासारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. तिथे विरोधकांचा आवाज दाबण्यात आला. विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. निवडणुकीत घोटाळे झाले. देशातील जनता महागाईशी लढत होती. अशा परिस्थितीत एक पंतप्रधान म्हणून देश चालविण्यात हसीना अपयशी ठरल्या. लोकशाहीचा मुखवटा धारण करून त्यांनी हुकूमशाही पद्धतीने देश चालवला. त्याचा काय परिणाम झाला. यामुळे याचा विचार भारतातील राज्यकर्त्यांनीही केला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

बांग्लादेशात पुन्हा आंदोलन! सोशल मीडिया बंद, विद्यार्थी उतरले रस्त्यांवर; तणावात वाढ  

मेघालयात नाईट कर्फ्यू

बांग्लादेशाच्या शेजारी असलेल्या भारतीय राज्यांत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आता सीमावर्ती मेघालय (Meghalaya) राज्यातून मोठी बातमी समोर आली आहे. बांग्लादेशातील चिघळलेली परिस्थिती पाहता मेघालय राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री प्रेस्टोन तिनसाँग यांनी दिली. दरम्यान, बांग्लादेशातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या (Sheikh Hasina) पक्षाची कार्यालये, पक्षनेत्यांची घरे, हॉटेल्स सरळसरळ पेटवून दिली जात आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube