Download App

Ashish Deshmukh यांचं थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आव्हान

मुंबई : काँग्रेसचे सर्व अधिकार मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्याकडे गेले आहेत. यावर काँग्रेसच्या काही नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. हे नाराज झालेले नेते निवडणूक आयोगाकडे (Election Commission) जाणार आहे. खर्गेंनी घेतलेले निर्णय काँग्रेसच्या संविधानाविरोधात असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि माजी आमदार अशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केला आहे. काँग्रेसच्या नाराज नेत्यांनी दिल्लीत नामावंत वकिलांची भेट घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

अशिष देशमुख म्हणाले, काँग्रेसच्या संविधानानुसार लोकशाही पद्धतीने कोणत्याही पदावरील व्यक्तीची निवड व्हावी. राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जून खर्गे यांची निवड देखील लोकशाही पद्धतीने झाली होती. रायपूर अधिवेशनात प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याला अपेक्षा होती की निवडणुकीद्वारे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य निवडले जातील. पण मागील 28 वर्षापासून पार्टीकडून फक्त निवडी जाहीर केल्या जात आहेत. यासाठी काही नेत्यांनी एकत्र येत नामावंत वकिलांची भेट घेतली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाकडे जाण्याचे ठरले आहे. गरज पडली तर कोर्टात देखील जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

तोतऱ्याचा महाराष्ट्राला अभिमान! तुम्ही,19 बंगले कुठे गायब केले ते सांगा ? ; सोमय्यांचे ठाकरेंना चॅलेंज

पुढं अशिष देशमुख म्हणाले, आमचे हाय कमांड विरोधात कोणतेही पाऊल नाही. काँग्रेसचे संविधान सांगते की कोणत्याही निवडी ह्या डायरेक्ट होऊ नयेत, निवडणुकीद्वारे पद भरली जावीत. निवडणुकीद्वारे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि प्रदेशाध्यक्षांची निवड केली जावी, अशी आमची मागणी असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

काँग्रेसच देशाला वाचवू शकते. काँग्रेसला आपल्या पारंपारिक पद्धतीतून बाहेर येण्याची गरज आहे. निवडणुकीतून नवीन लोकांना संधी मिळेल. नुकत्याच मेघालय, नागालॅंड आणि त्रिपुरात निवडणुका झाल्या पण तिथं काँग्रेसची काय अवस्था आहे? असा सवाल त्यांनी केला आहे. गेल्या तीस चाळीस वर्षापासून तेच ते नेते दिल्लीत बसून निर्णय घेत आहेत. यातून काँग्रेसमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत. काँग्रेसला बदलण्यासाठी पक्षाअंर्तगत पदावर निवडणुकीद्वारे नेत्यांची निवड होण्याची गरज आहे, असे अशिष देशमुख यांनी सांगितले.

Tags

follow us