तोतऱ्याचा महाराष्ट्राला अभिमान! तुम्ही,19 बंगले कुठे गायब केले ते सांगा ? ; सोमय्यांचे ठाकरेंना चॅलेंज

तोतऱ्याचा महाराष्ट्राला अभिमान! तुम्ही,19 बंगले कुठे गायब केले ते सांगा ? ; सोमय्यांचे ठाकरेंना चॅलेंज

Maharashtra Politics : संजय राऊत काय काय बोलतात, उद्धव ठाकरे तर मला तोतऱ्या म्हणतात. होय या तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान आहे. माझे उद्धव ठाकरेंना खुले चॅलेंज आहे. मला काय शिव्या द्यायच्या त्या द्या पण ते 19 बंगले आपण कुठे गायब केले याचाही हिशोब द्या अशा शब्दांत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले.

सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे, संजय राऊत, हसन मुश्रीफ आणि अनिल परबांवरील कारवाई या मुद्द्यांवर सडेतोड उत्तरे दिली. संजय राऊत यांनी काय शिव्या दिल्या हेही सोमय्या यांनी भर पत्रकार परिषदेत सांगितले. खालच्या पातळीची लोकं खालची भाषा बोलतात असे सोमय्या यांनी सांगितले.

वाचा : हसन मुश्रीफांना दिलासा तर किरीट सोमय्यांना दणका; मुश्रीफ प्रकरणात चौकशीचे आदेश

सोमय्या यांनी मुश्रीफांवरील ईडीच्या कारवाईवरही भाष्य केले. ते म्हणाले, की मुश्रीफांवर दुसऱ्यांदा कारवाई नाही तर ही कारवाई अनेक दिवसांपासून सुरू आहे. मुश्रीफ यांनी 58 कोटींचा गैरव्यवहार केल्याची कबुली आयकर विभागाला दिल्याचा दावाही त्यांनी केली.

किरीट सोमय्यांनी घोटाळा झाल्याचं केलं मान्य, म्हणाले हो

लोकांचा बारामतीवर विश्वास नाही

सोमय्या यांनी आधीच एफआयआर कशी मिळते, त्यांना आधीच सगळी माहिती कशी मिळते, या विरोधकांच्या प्रश्नांनाही त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की एफआयआर ही पब्लिक डॉक्यूमेंट आहे त्यामुळे ती कुणालाही मिळू शकते. आम्हाला आधी पुरावे मिळतात कारण लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. लोकांना आता बारामतीवर विश्वास राहिलेला नाही. त्यांचा मोदी फडणवीसांवर विश्वास आहे.

मला भीती नाही, कोणत्याही चौकशीला तयार

किरीट सोमय्या यांचीही न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, असे पत्रकारांनाी विचारले असता सोमय्या म्हणाले, की आम्ही टेन्शन घेणार नाही. खुशाल चौकशी करा. मला कोणतीच भीती नाही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube