Download App

भाजपने नाही तर ‘या’ दोन पक्षांनी घालवले सरकार, आकडेवारी पाहून गेहलोतांना झोप लागणार नाही

Rajasthan Election Congress Result : राजस्थान विधानसभा निवडणुकीतील (Rajasthan Election) काँग्रेसच्या पराभवावर पक्षामध्ये मंथन सुरु आहे. यावेळी सीएम अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांना राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ताबदलाची परंपरा मोडीत काढायची होती, मात्र त्यांना यश आले नाही. जनतेने त्यांना या ऐतिहासिक संधीपासून लांब ठेवले. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेसच्या या पराभवार राजकीय विश्लेषकांकडून अनेक तर्क लावले जात आहेत. काहींच्या मते काँग्रेसच्या पराभवात राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे (RLP) नेते हनुमान बेनिवाल आणि बसपा प्रमुख मायावती यांची प्रमुख भूमिका होती.

असा बसला काँग्रेसला धक्का
हनुमान बेनिवाल यांच्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाला 2.39 टक्के आणि बसपाला 1.82 टक्के मते मिळाली. म्हणजे दोन्ही पक्षांना 4.21 टक्के मते मिळाली आहेत. दुसरीकडे या निवडणुकीत काँग्रेसला भाजपपेक्षा केवळ 2.16 टक्के कमी मते मिळाली आहेत. अशा परिस्थितीत आरएलटीपी आणि बसपने गेहलोत सरकारला सत्तेतून खाली खेचले.

आजच्या काळात आमदाराकी, खासदारकी मागितली जाते पण मावळे निस्वार्थ लढले

भाजपच्या 42 जागा वाढल्या
अंतिम मतमोजणीनंतर पक्षांना झालेला जागांचा फायदा-तोटा आणि मतांच्या टक्केवारीच्या आकडेवारीनुसार काँग्रेसला एकूण 0.23 टक्के जास्त तर भाजपला 2.92 टक्के जास्त मते मिळाली आहेत. मात्र जागांच्या बाबतीत हे अंतर अधिक आहे. राज्यात काँग्रेसच्या 30 जागा कमी झाल्या असून भाजपला 42 जागांचा थेट फायदा झाला आहे.

नौदलाच्या गणवेशावर आता छत्रपती शिवरायांची राजमुद्रा : PM मोदींची मोठी घोषणा

राजस्थानमधील एकूण 199 विधानसभा मतदारसंघांवर झालेल्या निवडणुकीत भाजपला 115 जागा मिळाल्या, तर सत्ताधारी काँग्रेसला केवळ 69 जागा मिळाल्या होत्या. भारत आदिवासी पक्षाला तीन, बसपाला दोन, आरएलडी आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाला (RLTP) प्रत्येकी एक जागा मिळाल्या. उर्वरित आठ जागा इतरांच्या वाट्याला गेल्या.

Tags

follow us