…तरीही 2024 पर्यंत शिंदेंच मुख्यमंत्री राहतील, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

…तरीही 2024 पर्यंत शिंदेंच मुख्यमंत्री राहतील, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

Prakash Ambedkar : पाच राज्यातील निकालानंतर 2024 मध्ये लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होतील, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले होते. यावर वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले की पाच राज्यातील निकालामुळे मुख्यमंत्री बदलाणार नाहीत. 2024 पर्यंत एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहतील, असा टोला आंबेडकरांनी ठाकरेंना लागवला.

पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. पाचपैकी तीन राज्यात भाजपने सत्ता मिळवली आहेत तर एका राज्यात काँग्रेसकडे सत्ता आली आहे. यावर आंबेडकर म्हणाले की या निकालाचे विश्लेषण करायला अजून वेळ आहे. भाजपाच्या विजयाचे कारण काय? हे निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर माहिती टाकल्यावर बारकावे लक्षात येतील. पण निकालावरुन दिसून येतं की भाजपची पिछेहाट होतीय असं एक नॅरेटीव्ह सुरु होतं ते वस्तुस्थितीला धरुन नाही असं म्हणाता येईल.

मराठा समाजाच्या सर्वेक्षणावरुन राज्य मागासवर्ग आयोगात मतभेद, तिसऱ्या सदस्याने दिला राजीनामा

तीन राज्यातील पराभवामुळे काँग्रेसची इंडिया आघाडीतील बारगेनिंग पॉवर कमी होईल का? यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की काँग्रेसची आघाडी नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यासोबत आहे. ममता बॅनर्जी आणि इतर नेत्यांसोबत त्यांची आघाडी व्हायची आहे. त्यामुळे बारगेनिंग पॉवर कमी झाली असं म्हणता येणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

इंडिया आघाडीत वंचितचा स्थान मिळेल का? यावर ते म्हणाले की आम्ही तर आधीपासून तयार आहोत आणि आत्ता देखील म्हणतोय. पण आम्हाला कोणी घेणार नाही हे देखील आम्हाला माहिती आहे. आधी दोन भटजी तयार नव्हते, आता ते भटजी तयार झाले पण अजूनही होत नाही.

I.N.D.I.A. च्या पराभवाचा साईड इफेक्ट; काँग्रेसचं टेन्शन वाढणार? कारण..,

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यावर आंबेडकर म्हणाले की ही मागणी मी अगोदर पण केली आहे. लोकांच्या आणि राजकीय नेत्यांच्या मनात काही प्रश्न आहेत. कायद्यात बॅलेट किंवा ईव्हीएम वापरा हे दोन्ही पर्याय आहेत. 2004 ला देखील माझा पराभव झाल्यानंतर मी म्हटलं होतं की मला लोकांनी पाडलं नाहीत तर ईव्हीएमने पाडलं. दुर्दैवाने आपल्याकडील इंजिनियर जी मांडणी केली पाहिजे ती करत नाहीत, असे त्यांनी म्हटलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube