PM मोदींच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात पैशांची उधळपट्टी? कोट्यावधीच्या हेलिपॅडवरुन कोकणात वादळ
सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (4 डिसेंबर) कोकण दौऱ्यावर आहेत. नौदल दिनानिमित्त ते या दौऱ्यावर येत आहेत. मात्र त्यांच्या आगमानापूर्वीच दौऱ्याच्या खर्चावरुन कोकणात वादळ आले आहे. पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या हेलिपॅडवर तब्बल दोन कोटी 28 लाख रुपयांची उधळपट्टी झाली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान मोदी आणि भाजपला टॅग करुन याला नेमके काय म्हणायेच असा सवालही त्यांनी विचारला आहे. (Spokesperson of NCP (Sharad Pawar) group Vikas Lawande alleged that there was an extravagance of Rs 2 crore 28 lakh on Prime Minister Narendra Modi’s helipad.)
Amol Kolhe : वसुलीशिवाय जागा सोडायची नाही; मुंबई वाहतूक पोलिसांच्या अनुभवानंतर कोल्हेंचा सरकारवर निशाणा
लवांडे यांनी ‘एक्स’वरती एक वर्तमानपत्रातील शासकीय जाहिरात ट्वीट केली आहे. यात मोदींच्या कोकण दौऱ्यात तीन तात्पुरते हेलिपॅड बनवण्यासाठी दोन कोटी अठ्ठावीस लाख अडतीस हजार दोनशे तेवीस रुपये इतके पैसे खर्च झाले आहेत, असे त्यांनी म्हंटले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासाठी मालवणजवळ शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज मैदान, बोर्डिंग मैदान आणि ओझरमध्ये हेलिपॅड उभे करण्यासाठी देण्यात येणाऱ्या कंत्राटच्या जाहिरातीचा हा फोटो आहे.
₹22,838,223 (दोन कोटी अठ्ठावीस लाख अडोतीस हजार दोनशे तेवीस )हा आकडा आहे मोदीच्या कोकण दौऱ्यात 3 तात्पुरते हेलिपॅड बनवण्याचा!! @BJP4Maharashtra@narendramodi याला काय म्हणायचे ?? @NCPspeaks @supriya_sule @kolhe_amol pic.twitter.com/9OUofxdvUz
— Vikas Lawande (@VikasLawande1) December 4, 2023
पंतप्रधान मोदी सिंधुदुर्ग दौऱ्यावर :
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. संध्याकाळी 4.15 वाजता ते सिंधुदुर्गमध्ये पोहोचतील आणि राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. त्यानंतर सिंधुदुर्ग येथे नौदल दिन 2023 च्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची प्रात्यक्षिकेही ते तारकर्ली किनाऱ्यावरुन पाहणार आहेत. प्रशासनाकडून या दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.