Download App

आता दरवर्षी घोषित केला जाणार ‘बेस्ट आमदार ऑफ द इअर’; विधानसभा अध्यक्षांची घोषणा

Assembly Speaker यांनी आमदारांसाठी दिला जाणारा 'बेस्ट आमदार ऑफ द इअर' हा पुरस्कार दरवर्षी घोषित केला जाणार आहे. अशी घोषणा केली

Assembly Speaker announces Best MLA of the Year’ will now be announced every year : राज्याच्या विधानभवनात जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांना ज्याप्रमाणे त्यांच्या मतदार संघातील कामाची पोच पावती जनतेकडून मिळते. तसेच आता आमदारांना त्यांच्या विधान भवनातील कामगिरीसाठी देखील कौतुकाची थाप मिळणार आहे. कारण आता आमदारांसाठी दिला जाणारा ‘बेस्ट आमदार ऑफ द इअर’ हा पुरस्कार दरवर्षी घोषित केला जाणार आहे. त्यामुळे आता आमदारांना जर हा पुरस्कार पटकवायचा असेल तर त्यांना त्यासाठी लागणाऱ्या निकषांमध्ये बसावे लागणार आहे.

Video: स्पर्धा परिक्षांबाबत फडणवीस यांची मोठी घोषणा; यावर्षीपासून MPSC डिस्क्रीप्टिव्ह होणार

पुरस्कारासाठी पूर्ण करावे लागणार निकष

तर या पुरस्कारासाठी आमदारांना निवडण्यासाठी काही निकष लावण्यात आले आहेत. त्यामध्ये हा पुरस्कार देताना संबंधित आमदारांची सभागृहातील उपस्थिती, सभागृहातील कामकाजामध्ये त्यांनी दिलेले अर्थपुर्ण योगदान, त्यांनी केलेल्या भाषणाची गुणवत्ता तसेच सभागृहात सादर झालेल्या विविध विषयांवरील चर्चेत त्यांनी कशा प्रकारे सहभाग घेतला? या सर्व बाबी तपासून आमदारांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. विशेष म्हणजे आता हा पुरस्कार दरवर्षी घोषित केला जाणार आहे. अशी महत्त्वाची घोषणा दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांनी केली आहे.

चहल-धनश्रीच्या घटस्फोटाची ‘डेट फिक्स’; 60 कोटींच्या चर्चेत पोटगीचा खरा आकडा समोर

त्यामुळे आता दिल्ली विधानसभेमध्ये आमदारांसाठी हा एक महत्त्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ज्यानुसार आता दिल्ली विधानसभेच्या आमदारांना दरवर्षी ‘बेस्ट आमदार ऑफ द इअर’ हा पुरस्कार पटकावण्याची संधी मिळणार आहे. ज्या प्रमाणे संसदेमध्ये संसदरत्न खासदार हा पुरस्कार दिला जातो. त्याच धर्तीवर हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर संसदरत्न खासदार हा पुरस्कार माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या मागणीवरून प्राइम प्वाइंट फाउंडेशन या संस्थेने 2010 पासून सुरू केला आहे. तर कलाम यांच्याच हस्त या पुरस्काराचं उद्धाटन करण्यात आलं होतं.

follow us