नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत जिममध्ये ट्रेडमिलवर धावताना विजेचा धक्का लागून २४ वर्षीय सक्षमचा मृत्यू झाला. सक्षमचा मृत्यू कसा झाला हे आता पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर समोर आलं. सक्षमचा मृत्यू विजेच्या धक्काने झाल्याचं या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड झालं. (At delhi A man dies while running on a treadmill in gym What does the postmortem report say)
https://www.youtube.com/watch?v=YvWYxKSfwwg
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिल्लीतील रोहिणी येथे घडली. रोहिणी सेक्टर १९ मध्ये राहणारा सक्षम प्रुथी हा रोहिणी परिसरातील सिम्प्लेक्स फिटनेस झोनमध्ये व्यायामासाठी जात होता. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सखम हा व्यायाम करत असताना त्यांना ट्रेडमिलमध्ये धक्का बसला. यानंतर त्यांची प्रकृती खालावली. या घटनेनंतर सक्षमला त्याच्या मित्रांनी रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले होते.
जिममधील अपघातानंतर जिमच्या मालकाने सक्षमच्या कुटुंबीयांना या अपघाताची माहिती दिली. सक्षमला हृदयविकाराचा झटका आला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर सक्षमच्या आईला रडू आवरत नव्हते. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्यानंतर आता शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण समोर आले. ट्रेडमिलमध्ये विजेचा धक्का लागल्याने सक्षमचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सक्षमच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून जिम मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सक्षमच्या आईने याआधीही ट्रेडमिलमध्ये करंट असल्याच्या तक्रारी आल्या होत्या, परंतु जिम मालकाने तिच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. जिमवाल्यांनी ट्रेडमिल ठीक केली असती तर माझ्या मुलाचा जीव वाचला असता, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.
‘The: Trial’ फेम अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा; म्हणाला, ‘मी अन् काजोलने किसिंग सीन…’
पुढच्या महिन्यात प्रमोशन होणार होते
सक्षम हा गुरुग्राममधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होता. पुढच्या महिन्यात त्याचे प्रमोशन होणार होते. मृत सक्षमचा चुलत भाऊ मुकुल परुथी यांनी ही माहिती दिली. जिम मालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला आणि सक्षमचा मृत्यू झाल्याचे मुकूलने सांगितले. सक्षमच्या पश्चात वडील मुकेश कुमार, आई किरण आणि एक लहान बहीण आहे. हे कुटुंब मूळचे हिसारचे असून ते अनेक वर्षांपासून दिल्लीत राहत होते.
कुटुंबाची दिशाभूल झाली
चुलत भाऊ मुकुल यांनी सांगितले की, 24 वर्षीय सक्षमचा मृत्यूबाबत कुटुंबाची दिशाभूल झाली. सक्षमचे हृदय निकामी झाल्याचे जिम ऑपरेटरकडून सांगण्यात आले. सुरुवातीला घरच्यांचाही या दाव्यावर विश्वास होता. मात्र शवविच्छेदन अहवालात शॉक लागून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. कुटुंब जिममध्ये पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी संपूर्ण तपास केला होता. तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता सक्षमला विजेचा झटका बसला आणि त्याचे शरीर ताठ झाल्याचे दिसून आले होते, असं मुकुलने सांगितले. दरम्यान, सखामच्या मृत्यूनंतर खळबळ उडाली. याप्रकरणी जिम चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकुने सांगितले की, सक्षम खूप पूर्वीपासून या जिममध्ये जायचा. पण मध्येच त्याने जीम सोडली. दोन-तीन दिवसांपूर्वीच सक्षमने पुन्हा जिमला जायला सुरुवात केली होती. मुकुलच्या म्हणण्यानुसार, जे लोक वर्कआउट करण्यासाठी जिममध्ये येत असत, त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. ज्यामध्ये कधी पंखा, तर कधी विजेचा भाग बिघडलेला असे. अनेकवेळा तेथे आलेल्यांनी जिम चालकाकडे याबाबत तक्रारी दिल्या मात्र, वर्कआऊट करणाऱ्यांच्या तक्रारीला गांभीर्याने घेतले नाही.