Sikkim : सिक्किममध्ये मोठा अपघात; हिमस्खलनामुळे सहा पर्यटकांचा मृत्यू

हिमस्खलनामुळे सिक्कीममध्ये सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. सिक्कीमच्या नाथू ला पर्वतीय खिंडीत आज झालेल्या मोठ्या हिमस्खलनामुळे अनेक पर्यटक बर्फाखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हिमस्खलनाच्या वेळी या भागात 150 हून अधिक पर्यटक असल्याची माहिती मिळाल्याने पोहोच आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. सिक्कीममधील नथू ला सीमावर्ती भागात मंगळवारी हे हिमस्खलन झाले आहे. या […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 04T153716.025

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 04 04T153716.025

हिमस्खलनामुळे सिक्कीममध्ये सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. सिक्कीमच्या नाथू ला पर्वतीय खिंडीत आज झालेल्या मोठ्या हिमस्खलनामुळे अनेक पर्यटक बर्फाखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हिमस्खलनाच्या वेळी या भागात 150 हून अधिक पर्यटक असल्याची माहिती मिळाल्याने पोहोच आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

सिक्कीममधील नथू ला सीमावर्ती भागात मंगळवारी हे हिमस्खलन झाले आहे. या मध्ये आता 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 11 जण जखमी झाल्याचे कळते आहे. भारतीय लष्कराने व मदत- बचाव पथकाने 22 जणांची सुटका केली आहे. या हिमस्खलनामध्ये 80 टक्के लोक अडकल्याची माहिती आहे.

Kashmir : आतंकवादी संघटनेच्या निशाण्यावर RSS चे 30 नेते, तपास सुरु

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, या मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला, आणि एका मुलाचा समावेश आहे. या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. या हिमस्खलनानंतर गंगटोकला नाथू ला याला जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरु मार्गावर बचाव कार्य सुरु आहे. याठिकाणी रस्त्यावरील बर्फ हटवल्यानंतर 350 पर्यटक व 80 वाहनांची सुटका केली आहे.

सगळ्यात टवाळखोर पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शेलारांचा पलटवार

चेकपोस्टचे महानिरीक्षक सोनम तेनजिंग भूतीया यांनी सांगितले की, 13 वे मैल साठीच पास दिले जातात. मात्र, पर्यटक कोणत्याही परवानगीशिवाय 15 व्या मैलकडे गेले होते. सध्या सिक्कीम पोलीस, सिक्कीममधील ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन, पर्यटन विभागाचे अधिकारी, वाहन चालक यांच्या साहाय्याने मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.


	
Exit mobile version