Atiq Ahmed Son Accident: माफिया अतिक अहमदच्या (Atiq ahmed) मुलाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. 21 वर्षीय अबान अहमद (aban ahmed) हा प्रयागराजहून झाशी कारागृहात असलेल्या आपल्या मोठ्या भावाला भेटण्यासाठी जात होता. त्याची भरधाव वेगाने जाणारी कार अनियंत्रित होऊन डिव्हायडरवर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. पोलिसांनी कारमधील पाच जणांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी अबान आणि त्याचा मित्र सोनू याला मृत घोषित केले. तर आणखी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची ओळख उमर अहमद, मोहम्मद झैद आणि अस्लम अशी पटली आहे.
अजिंक्य रहाणेच्या खात्यात दरमहा येणार इतकी पेन्शन; BCCI च्या नियमांमुळे होणार मोठा फायदा
महामार्गावर कसा घडला अपघात ?
हा अपघात झाशी-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर पूंछ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगाने धावणाऱ्या क्रेटा कारसमोर अचानक एक प्राणी आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली.
अपघातावेळी क्रेटा कारमध्ये एकूण पाच जण प्रवास करत होते. अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी 21 वर्षीय अबान अहमद आणि त्याचा मित्र सोनू याला मृत घोषित केले.
पहिल्याच दिवशीच परीक्षा घेतली अन्… ‘बटवारा 1947’ च्या सेटवरील प्रीती झिंटाचा मजेशीर खुलासा
तिघांची प्रकृती गंभीर
या अपघातात उमर अहमद, मोहम्मद झैद आणि अस्लम हे गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारांसाठी महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. तर पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.
यापूर्वी असद अहमदचाही झाला होता मृत्यू
अतिक अहमदच्या कुटुंबावर यापूर्वीही मोठे संकट आले होते. त्याचा मुलगा असद अहमद एप्रिल 2023 मध्ये उमेश पाल हत्या प्रकरणाशी संबंधित पोलीस चकमकीत ठार झाला होता. आता धाकटा मुलगा अबान अहमद याचाही रस्ते अपघातात मृत्यू झाल्याने अतिक अहमदच्या कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे.
कॉकरोच जनता पार्टी पुढं काय करणार? सीजेपीच्या शिष्टमंडळाची छत्रपती संभाजीनगरमधून मोठी घोषणा
कोण आहे अतिक अहमद
अतिक अहमद हा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुख्यात माफिया आणि माजी खासदार होता. गुन्हेगारी आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्याचे नाव अनेक वर्षे चर्चेत राहिले. त्याच्यावर खून, अपहरण, खंडणी, जमीन बळकावणे यांसारख्या गंभीर स्वरूपाचे शंभरहून अधिक गुन्हे दाखल होते. 2004 मध्ये तो समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेला होता, तर त्याआधी पाच वेळा आमदारही राहिला होता. 2023 मध्ये उमेश पाल हत्या प्रकरणात त्याचे नाव समोर आल्यानंतर तो पुन्हा चर्चेत आला. त्याच वर्षी 15 एप्रिल रोजी 2023 रोजी प्रयागराजमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना पोलीस बंदोबस्तातच अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
चंद्रशेखर बावनकुळेंनीच कुणबी जात प्रमाणपत्र रद्द केले; मनोज जरांगेंचा थेट आरोप
