Download App

Atiq Ahmed Murder Case : तिन्ही आरोपींचा कोठडीतला मुक्काम वाढला

Atiq Ahmed Murder Case : गॅंगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed)आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf Ahmed)यांच्या हत्येप्रकरणी लवलेश तिवारी, सनी आणि अरुण मौर्य या तीन आरोपींना आज प्रयागराज सीजेएम न्यायालयात (CJM Courts)व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video conferencing)हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) 14 दिवसांची वाढ केली आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना 12 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. आज सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी (police) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली.

APMC Election : बारामतीमध्ये एकहाती सत्ता; विजयानंतर अजित दादा म्हणाले…

अतिक अहमद हत्याकांडातील आरोपी शूटर लवलेश तिवारी, अरुण मौर्य आणि सनी यांच्या न्यायालयीन कोठडीत 12 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तिन्ही आरोपी सध्या प्रतापगड जिल्हा कारागृहात आहेत. या प्रकरणाचा तपास करणार्‍या एसआयटीने 4 दिवसांची पोलीस कोठडी घेतल्यानंतर त्यांची आधीच चौकशी केली आहे. त्यानंतर त्यांच्या कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.

15 एप्रिलच्या रात्री अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेताना त्यांची हत्या करण्यात आली होती. तिन्ही आरोपी पत्रकार असल्याचे भासवून तेथे पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी अतिक आणि अशरफ यांची अनेक गोळ्या झाडून हत्या केली होती. यावेळी सुमारे 20 राउंड गोळीबार करण्यात आला. त्यानंतर तिघांनीही बंदूक फेकून घटनास्थळी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते.

अतिक-अशरफ खून प्रकरणाच्या पोलीस तपासात मोठा खुलासा झाला आहे. पोलीस कोठडीत असताना अतिक अहमदने स्वत:वर हल्ला करण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. पोलीस कोठडीत स्वत:वर हल्ल्याचे नाटक रचून त्याला सुरक्षा वाढवायची होती.

जेणेकरून इतर कोणीही त्याला मारू शकणार नाही आणि पोलिसांचा सामनाही होणार नाही. यासाठी त्याने त्याचा खास नेमबाज गुड्डू मुस्लिम याच्याकडे जबाबदारी सोपवली होती. गुड्डू मुस्लिमने पूर्वांचलमधील काही बदमाशांशीही संपर्क साधला होता.

ज्यामध्ये साबरमती कारागृहातून आणताना त्याच्यावर वाटेत किंवा इतरत्र हल्ला केला जाईल, जेणेकरून त्याची सुरक्षा वाढवता येईल, असे ठरले होते. लवलेश, अरुण आणि सनी या तीन नेमबाजांना अतिक अहमदच्या टोळीने बोलावले होते का? याचा तपास आता तपास यंत्रणा करत आहेत. टोळीतील सदस्याने हल्ल्याचे नाटक न करता ठार मारण्याची सुपारी दिली असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Tags

follow us