हातात तलवारी, बंदुका घेऊन पोलिस स्टेशनवर हल्ला, Khalistan आंदोलन पुन्हा पेटले

पंजाबच्या ( Punjab ) अमृतसरमधील ( Amrutsar ) अजनाला या पोलिस स्टेशनवर गुरुवारी खलिस्तानवादी समर्थकांनी ( Khalisthani Attack )  हल्ला केला आहे. वारीस पंजाब दे  या संघटनेच्या समर्थकांनी हा हल्ला केला आहे. वारीस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपालसिंह याच्याशी संबंधित व्यक्ती लवप्रीतसिंह तुफान याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला सोडवण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. लवप्रीतसिंह […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (73)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (73)

पंजाबच्या ( Punjab ) अमृतसरमधील ( Amrutsar ) अजनाला या पोलिस स्टेशनवर गुरुवारी खलिस्तानवादी समर्थकांनी ( Khalisthani Attack )  हल्ला केला आहे. वारीस पंजाब दे  या संघटनेच्या समर्थकांनी हा हल्ला केला आहे. वारीस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपालसिंह याच्याशी संबंधित व्यक्ती लवप्रीतसिंह तुफान याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला सोडवण्यासाठी हा हल्ला करण्यात आला.

लवप्रीतसिंह याच्यावर अपहरणाचा आरोप आहे. एका तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट लिहून अपहरण करुन मारहाण केल्याचे सांगितले होते. यावरुन तुफान व इतर 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

तुफानला सोडवण्यासाठी खलिस्तानवादी समर्थक मोठ्या संख्येने आले होते. त्यांनी जवळपास 8 जिल्ह्यातून आलेल्या 800 पोलिसांना पिटाळूण लावले आहे. पोलिसांनी त्यांना अडवण्यासाठी पोलिस स्टेनशनपासून 400 मी. व 100 मी. दूरच्या अंतरावर बॅरिकेड्स तैनात केले होते. आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडत पोलिस स्टेशनवर हल्ला केला. आंदोलकांनी यावेळी खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. या हल्ल्यानंतर पोलिसांनी तुफानला सोडण्याची घोषणा केली. या हल्ल्यामध्ये 6 पोलिस जखमी झाले आहेत.

(Bill Gates : भारताच्या भविष्याबद्दल बिल गेट्स यांनी काय म्हटल.. ऐकून तुम्हाला गर्व वाटेल)

दरम्यान या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याने थेट धमकी दिली आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी खलिस्तान चळवळीला विरोध करण्याची किंमत चुकवावी लागली होती. आम्हाला कोणीही अडवू शकत नाही. ते पीएम मोदी असोत, शाह असो किंवा भगवंत मान असो, आम्हाला कोणीही अडवू शकत नाही, अशा शब्दात त्याने थेट धमकी दिली आहे.

गेल्या काही काळापासून खलिस्तान चळवळीचे हल्ले हे देशातच नाही तर  देशाच्या बाहेर देखील होत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे 12 जानेवारी रोजी स्वामीनारायण मंदिरावर हल्ला करण्यात आला होता. तसेच कॅनडामध्ये देखील मंदिरांवर हल्ले करण्यात आले होते.

Exit mobile version