Bill Gates : भारताच्या भविष्याबद्दल बिल गेट्स यांनी काय म्हटल.. ऐकून तुम्हाला गर्व वाटेल
कोरोनाच्या कठीण काळानंतरही भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे. उद्योगपती बिल गेट्स यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचा हा वेग यापुढेही कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आपल्या ‘गेट्स नोट्स’ या ब्लॉगमध्ये म्हणाले आहेत की, भारत भविष्यासाठी एक आशा आहे.’ बिल गेट्स यांनी त्यांच्या एका ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, “भारत भविष्याची एक आशा आहे आणि जगाला अनेक संकटांचा सामना करावा लागत असतानाही भारत एकाच वेळी मोठ्या समस्या सोडवू शकतो.”
India gives me hope for the future. I’m excited to visit next week and see the work being done by innovators and entrepreneurs to tackle big challenges like climate change, health, and hunger. https://t.co/vnVpLNROtZ
— Bill Gates (@BillGates) February 22, 2023
हेही वाचा : Adani Group गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटी बुडाले, अदानीची संपत्तीही 8.5 लाख कोटींनी घटली
भारताने स्वतःला सिद्ध केले
बिल गेट्स यांनी त्यांच्या ब्लॉग मध्ये म्हटले आहे की संपूर्ण भारत मला भविष्यासाठी आशा देतो. हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होण्याच्या मार्गावर आहे आणि याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आपण बहुतेक समस्या मोठ्या प्रमाणावर सोडवू शकत नाही. असे असले तरी, भारताने हे सिद्ध केले आहे की हा देश सर्वात मोठ्या आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम आहे.
देशाच्या कामगिरीचे कौतुक
बिल गेट्स यांनी आपल्या याच ब्लॉगमध्ये देशात राबविलेल्या अनेक मोहिमांचा उल्लेख केला. त्यांनी पुढे लिहिले आहे की, भारताने पोलिओचे निर्मूलन केले आहे, एचआयव्हीचा प्रसार कमी करण्यात यश मिळवले आहे, गरिबी कमी करण्यासाठी मोठी पावले उचलली आहेत. याशिवाय बिल गेट्स यांनी आपल्या ब्लॉगमध्ये भारतात येण्याबद्दल उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘मी पुढच्या आठवड्यात पुन्हा भारतात जाणार आहे. मी गेल्या अनेक वर्षांमध्ये तेथे बराच वेळ घालवला असला तरी कोरोनानंतर मी तिथे गेलेलो नाही.”