Download App

अतुल सुभाष आत्महत्येप्रकरणी मोठी कारवाई, पत्नी निकितासह तिघांच्या आवळल्या मुसक्या…

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात सातत्याने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या त्यांची पत्नी, सासू आणि मेव्हण्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

  • Written By: Last Updated:

Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाष (Atul Subhash) आत्महत्या प्रकरणात सातत्याने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या त्यांची पत्नी, सासू आणि मेव्हण्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पत्नी निकित हिला गुरुग्राममधून तर आई निशा आणि भाऊ अनुराग याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अतुल यांनी निकिता आणि तिच्या कुटुंबीयांवर छळ आणि खंडणीचा आरोप करत आत्महत्या केली होती.

कही खुशी कही गम! भाजपाच्या ‘या’ दोन माजी मंत्र्यांचा पत्ता कट? पडद्यामागं काय ठरलं.. 

शुक्रवारी बेंगळुरू पोलिसांनी निकिता सिंघानियाच्या जौनपूर येथील घराला नोटीस बजावली होती. नोटीसमध्ये 15 दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर निशा सिंघानिया आणि अनुराग सिंघानिया प्रयागराजमध्ये लपल्याची माहिती बेंगळुरू पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली. यासोबतच निकिताला गुरुग्राममधून अटक करण्यात आली. तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. निकिताचा मामा सुशील सिंघानिया सध्या फरार असून पोलिस त्याचाही शोध घेत आहेत.

जळगावमध्ये ठरलं! भाजप, शिंदे अन् अजित पवार गटाच्या ‘या’ तिघांचं मंत्रिपद फिक्स 

दरम्यान, निकिता सिंघानिया, निशा सिंघानिया आणि अनुराग सिंघानिया यांच्या वतीने अलाहाबाद उच्च न्यायालयात अंतरिम जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, बंगळुरू पोलिसांचे एक पथक शुक्रवारी यूपीमधील जौनपूर येथे पोहोचले होते, जिथे पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया, मेहुणे राहतात. मात्र, पोलीस तेथे पोहोचले असता निकिताच्या घराला कुलूप आढळून आले. निकिताची आई निशा आणि तिचा भाऊ अनुराग एक दिवस आधी घराला कुलूप लावून रात्रीच्या अंधारात पळ काढला. अशा परिस्थितीत पोलिसांनी घरावर नोटीस चिकटवली होती. नोटीसमध्ये म्हटले आहे की, बंगळुरूमध्ये दाखल झालेल्या खटल्यात तुमचा जबाब नोंदवून घ्या, असं या नोटीशीत म्हटलं होतं.

दरम्यान, पत्नी आणि सासरच्या लोकांवर छळाचा आणि न्याय व्यवस्थेतील त्रुटींचा आरोप करून आत्महत्या करणाऱ्या एआय इंजिनिअर अतुल सुभाष यांनी दीड तासाच्या व्हिडिओसह २३ पानांची सुसाईड नोट लिहिली होती. त्यामध्ये, त्यांनी लग्नाच्या सुरूवातीपासून ते पत्नीशी झालेल्या वादापर्यंत, त्यांच्यावरील प्रत्येक केस आणि त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारा प्रत्येक मुद्दा सविस्तरपणे सांगितला होता.

या सुसाईड नोटमध्ये त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. आपला पगार 80 हजार रुपये आहे. आपली पत्नी आपल्यासोबत राहत नाही. तिने आपल्याविरोधात 9 खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यासाठी सतत जौनपूरच्या वाऱ्या कराव्या लागतात. न्यायालयाच्या निर्णयानुसार मुलासाठी 40 हजार रुपये पाठवतो. आता ते दरमहा 80 हजार रुपयांची मागणी करत आहेत. हा सगळा खेळ पैशासाठी सुरू आहे. आत्महत्येसाठी मला या लोकांनी प्रवृत्त केल्याचं अतुल यांनी म्हटले होतं.

follow us