Avoid traveling on Pune-Bengaluru Highway Appeal by Kolhapur Inspector General of Police Ranjankumar Sharma : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी परिसरात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील (NH-48) वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे आणि सातारा येथून कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनी शक्य असल्यास या महामार्गावरील प्रवास टाळावा, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी केले आहे.
अनधिकृत सदनिकांच्या नोंदणीला आळा; घरखरेदीदारांच्या हितासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
बुधवारी मध्यरात्री सुमारे एक वाजता रंजन कुमार शर्मा यांनी व्हिडीओच्या माध्यमातून प्रवाशांसाठी वाहतुकीबाबत सूचना जारी केल्या. प्रवाशांनी शक्य असल्यास प्रवास पुढे ढकलावा किंवा बेळगावला जाण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे त्यांनी सांगितले.
पुणे पदवीधर निवडणूक, शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी, निवडणुकीत नवीन ट्विस्ट येणार ?
साताऱ्याहून बेळगावला जाण्यासाठी रहिमतपूर, तासगाव, मिरज आणि गोकाकमार्गे जाण्याचा पर्याय त्यांनी सुचवला आहे. तसेच कराडहून आष्टा, सांगली आणि मिरजमार्गे बेळगावकडे जाता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.सरकारसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कर्नाटकातील रयत संघाने हे आंदोलन सुरू केले आहे.
रोहित शर्माला धक्का, IPL 2027 मध्ये ‘हा’ खेळाडू होणार मुंबई इंडियन्सचा कर्णधार?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरेचा किमान आधारभूत विक्री दर (MSP) प्रतिकिलो 50 रुपये आणि इथेनॉलचा खरेदी दर प्रतिलिटर 70 रुपये करण्याची शेतकरी संघटनांची मागणी आहे. वार्षिक ऊस गाळप हंगाम सुरू होण्याच्या काही दिवस आधी या मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
मोदी सरकारमध्ये पाच नवीन मंत्री, 15 दिवसांच्या आत मोठी घोषणा, श्रीकांत शिंदेंना संधी?
या मागण्या मान्य झाल्यास साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना प्रतिटन 5,000 रुपये ऊसदर देणे शक्य होईल, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.कोगनोळी परिसरातील टोलनाक्यांपुढे सुरू असलेल्या आंदोलनामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या आंतरराज्य महामार्गावरील वाहतुकीवरही गंभीर परिणाम झाला आहे.
