Download App

Ayodhya : 400 किलोचं कुलूप अन् 30 किलोची चावी करणार राम मंदिराचं रक्षण

Ayodhya 400 KG Gram lock : 22 तारखेला होणाऱ्या अयोध्येतील (Ayodhya) श्रीरामांच्या (Ram Mandir) प्राण प्रतिष्ठासोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. त्यात श्रीरामांसाठी अयोध्येत देशभरातील भाविकांकडून खास भेटवस्तू (Special gifts for Shriram) पाठवल्या जात आहेत. त्यात श्रीराम मंदिराच्या संरक्षणासाठी तब्बल 400 किलो वजनाचा कुलूप आणि 30 किलो वजनाची चावी पाठवण्यात आली आहे.

पत्रकारांची तक्रार, अजितदादांनी थेट आयुक्तानांच फटकारलं; काय होतं पोलिसांचं फर्मान?

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अगोदर अलिगड होऊन हे कुलूप अयोध्येत येण्यासाठी रवाना झालं आहे. हे कुलूप अयोध्येमध्ये अलीगडचं प्रतीक म्हणून स्थापन केले जाईल. ज्यामुळे अलीगडमधील व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळेल. हे कुलूप दिवंगत सत्यप्रकाश शर्मा यांनी निर्माण केलं आहे. हे कुलूप जगातील सगळ्यात मोठे कुलूप असल्याचेही सांगितलं जातं. 2021 मध्ये हे कुलूप बनवायला सुरुवात करण्यात आली होती. तर यासाठी तीन लाखांचा खर्च आला आहे. कुलपाची उंची दहा फूट तर रुंदी सहा फुट आणि जाडी ही सहा इंच आहे.

महिलेला गंडा घातल्याप्रकरणी भोंदूबाबा अटकेत : शरद पवार गटाचा पदाधिकारी असल्याचा दावा

हे कुलूप बनवणारे सत्यप्रकाश शर्मा यांचं म्हणणं होतं की, ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांचे मंदिर अद्भुत बनत आहे. त्याप्रमाणेच त्या ठिकाणची प्रत्येक गोष्ट ही अद्भुत असली पाहिजे. त्यासाठीच हे भव्य कुलूप तयार करण्यात आलं होतं. पण दुर्दैवाने या कुलपाची निर्मिती पूर्ण होण्याच्या अगोदरच सत्यप्रकाश शर्मा यांचे निधन झालं. त्यामुळे आता आयोध्याकडे रवाना झालेल्या हे कुलूप सत्यप्रकाश शर्मांच हे स्वप्न पूर्ण करणार आहे.

तर शर्मा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातून हे कुलूप सांभाळणार कोणी नव्हतं. त्यामुळे आखाडा परिषद आणि मनसादेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांच्या शिष्या अन्नपूर्णा भारती यांनी या कुलपाची निर्मिती करून घेतली. त्यामुळे या कुलपावर शर्मादांपत्यसह अन्नपूर्णा भारतीयांचे ही नाव लिहिण्यात आलं आहे. त्यानंतर आता भारतीय स्वतः हे कुलूप घेऊन अयोध्येकडे रवाना झाले आहेत. एका ट्रकमध्ये हे कुलूप अयोध्येकडे जाण्यासाठी निघाले आहे. त्या अगोदर त्याची हार घालून पूजा करण्यात आली. तर रस्त्यामध्ये भाविकांकडून या कुलपावरती फुलांचा वर्षाव करत जय श्रीराम जय घोषणा दिल्या जात आहेत.

follow us