Ram Mandir : सोन्या-चांदीच्या खडावा ते 2100 किलोंची घंटा; श्रीरामांसाठी अयोध्येत आल्या 10 खास भेटवस्तू

Ram Mandir : सोन्या-चांदीच्या खडावा ते 2100 किलोंची घंटा; श्रीरामांसाठी अयोध्येत आल्या 10 खास भेटवस्तू

Ram Mandir Special gifts for Shriram : 22 तारखेला होणाऱ्या अयोध्येतील श्रीरामांच्या (Ram Mandir) प्राण प्रतिष्ठासोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. त्यात श्रीरामांसाठी अयोध्येत देशभरातील भाविकांकडून खास भेटवस्तू (Special gifts for Shriram) पाठवल्या जात आहेत. त्यात सोन्या-चांदीच्या खडावा ते 2100 किलोंची घंटा अशा काही खास 10 भेटवस्तूंबद्दल आपण जाणून घेणार आहोत. चला तर पाहुयात कोणत्या आहेत या 10 खास भेटवस्तू आणि त्यांची खासियत काय?

संताजी-धनाजी यांच्या घोड्यांप्रमाणे मोदींना आमची चिंता, शरद पवारांचा हल्लाबोल

हे भेटवस्तूंमध्ये श्रीरामांची सासुरवाडी म्हणजेच माता सीतेची जन्मभूमी नेपाळमधील जनकपुरहून आयोध्येत काही भेटवस्तू आल्या आहेत. श्रीलंकेहून आलेल्या एका प्रतिनिधीमंडळाने अयोध्येचा दौरा केला. त्यांनी यावेळी अशोकवाटीकेहून एक दगड देखील भेट म्हणून आणला आहे. कारण असं सांगितलं जातं की, याच श्रीलंकेतील अशोक वाटिकेमध्ये रावणाने माता सीतेला ठेवलं होतं. त्याचबरोबर बिहारचं मिथिला यासह देशातील अनेक ठिकाणांहून खास भेटवस्तू श्रीरामांसाठी येत आहेत पाहूयात याबद्दल सविस्तर…

‘लोकसभा निवडणूक लढा’; प्रकाश आंबेडकरांचे मनोज जरांगे पाटलांना आवाहन

विष्णूचा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीरामांसाठी भगवान श्रीकृष्णांची जन्मभूमी मथुरा या ठिकाणहून 200 किलोंच्या लाडूंचा प्रसाद अर्पण केला जाणार आहे. यामध्ये तब्बल 1.11 लाख लाडू असणार आहेत. हे लाडू खास खवा आणि साखरेपासून बनवण्यात आले आहेत. तर गुजरातच्या वडोदरा याठिकाणहून श्रीरामांसाठी तब्बल 108 फूट लांबीची अगरबत्ती अर्पण करण्यात येणार आहे. ही अगरबत्ती अत्यंत सुंदर आणि विशाल आहे. तिचं वजन तब्बल तीन हजार सहाशे किलो असल्याचे सांगण्यात आलं आहे. ही अगरबत्ती पेटवल्यानंतर जवळपास दोन महिन्यांपर्यंत ती सुरू राहणार आहे. तर तिची किंमत पाच लाख रुपये असल्याची सांगितले जात आहे.

कोचिंग क्लासेसमध्ये १६ वर्षाखालील मुलांना प्रवेश नाही; आव्हाड म्हणाले, ‘ही तर हुकूमशाही….’

त्यानंतरची भेट वस्तू आहे. ती म्हणजे गुजरातवरूनच आलेला एक अनोखा ध्वजदंड श्री राम मंदिराच्या शिखरावर लावण्यासाठी हा ध्वजदंड देण्यात आला आहे. ज्याची लांबी 44 फूट आणि वजन जवळपास साडेपाच टन असल्याचे सांगण्यात येत आहे. हा ध्वजदंड गुजरातचे मुख्यमंत्री भूपेश पटेल यांनी अयोध्येत पाठवला आहे.

कोचिंग सेंटर्सचा बाजार उठणार?; सरकारचा मास्टर स्ट्रोक विद्यार्थ्यांसाठी किती फायद्याचा

त्यानंतर प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी म्हणजेच 22 तारखेला अयोध्येसह देशभरात श्रीरामांच्या स्वागतासाठी दिवे लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठा दिवा असेल तो म्हणजे गुजरातमधील वडोदरा या ठिकाणहून आलेला तब्बल अकराशे किलोचा विशाल दिवा. हा दिवा गुजरातवरून अरविंद भाई पटेल यांनी पाठवला आहे. तो बनवण्यासाठी माती आणि पंचधातूचा वापर करण्यात आला आहे. तर हा दिवा तेवत ठेवण्यासाठी एकावेळी तब्बल साडेआठशे लिटर तूप लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Sanskruti Balgude : संस्कृतीचा हिरव्या लेदर स्कर्टड्रेसधील हॉट अंदाज

आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की, मंदिर म्हटलं की, त्या मंदिरात घंटा नाद आलाच. यासाठीच श्रीराम मंदिरामध्ये तब्बल 2100 किलोंची घंटा लावण्यात येणार आहे. ही घंटा बनवण्यासाठी तब्बल दोन वर्ष लागले असून यासाठी अष्टधातू वापरण्यात आले आहेत. या घंटीची उंची सहा फूट आणि लांबी पाच फूट आहे. तर तिची किंमत ही तब्बल दहा लाख रुपये आहे. तसेच या घंटेचा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

‘आधी 2.5 लाख कोटींच्या करारांचा हिशोब द्या’; दावोस दौऱ्यावरून परतलेल्या CM शिंदेंना देशमुखांचा सवाल

त्यानंतरची भेटवस्तू आहे ती म्हणजे भगवान श्रीरामांच्या मंदिराच्या सुरक्षेसाठी अलीगडवरून आलेलं दहा फूट उंच कुलूप. अलिगडमधील कुलूप निर्माते उद्योगपती सत्यप्रकाश शर्मा यांनी हे अनोखं कुलूप स्वतःच्या हाताने श्री राम मंदिरासाठी तयार केले. या कुलपाच वजन तब्बल 400 किलो आहे. तसेच कुलूप जगातील सगळ्यात मोठं कुलूप आणि चावी असल्याचं सांगण्यात येते.

Shaitaan Movie: सुपरनॅचरल थ्रिलरसाठी आर माधवन अन् अजय देवगण पहिल्यांदाच एकत्र

तर लखनऊवरून श्रीराम मंदिरासाठी एक अनोखं घड्याळ भेट म्हणून देण्यात आले आहे. लखनऊच्या भाजी विक्रेत्यांनी हे घड्याळ तयार केला असून यामध्ये एकाच वेळी तब्बल आठ देशातील प्रमाण वेळा समजणार आहेत. ज्यामध्ये भारत, टोकियो, मॉस्को, दुबई, बीजिंग, सिंगापूर, मेक्सिको सिटी आणि वॉशिंग्टन डीसी यांचा समावेश आहे.

Ram Mandir : ‘मेरे रामलल्ला विराजमान हो गए’ म्हणत पाकिस्तानी क्रिकेटपटूने शेअर केला श्रीरामांचा फोटो

तर प्रभू श्रीरामांसोबतच माता सीतेसाठी देखील या भेटवस्तूंमध्ये एक खास साडी आलेली आहे. गुजरातमधील सुरत येथील कवडा व्यावसायिकांनीही खास साडी तयार केली आहे. ज्या साडीवर अयोध्येतील मंदिरांचं तसेच श्रीरामांच्या जीवनातील प्रसंगांचेही चित्रीकरण करण्यात आले आहे. तसेच सुरतवरूनच एका हिरा व्यापाऱ्याने तब्बल 5000 अमेरिकन डायमंड आणि दोन किलो चांदीचा वापर करून बनवलेला एक खास हार प्रभू श्रीरामांसाठी पाठवला आहे. त्यानंतरची भेटवस्तू आहे ती म्हणजे एक तब्बल 56 इंच रुंद असलेला सोन्याचा पत्रा लावलेला नगाडा. हा नागडा गुजरातच्या दर्यापूर येथील अखिल भारतीय दगड समाज यांच्याद्वारे तयार करण्यात आला आहे.

त्यानंतरची आणखी एक खास भेटवस्तू आहे. त्या म्हणजे प्रभू श्रीरामांसाठी हैदराबादहून आलेल्या सोन्याच्या खडावा. आपल्या कारसेवक वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हैदराबादचे 64 वर्षीय चल्ला श्रीनिवास शास्त्री हे आयोध्येला भेट देत आहेत. त्यावेळी ते ही खास भेटवस्तू प्रभू श्रीरामांना अर्पण करणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube