Chief Justice Of India : बी. आर. गवई हे भारताचे दुसरे दलित मुख्य न्यायाधीश होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश (Chief Justice Of India) संजीव खन्ना यांनी केंद्रीय कायदा मंत्रालयाला न्यायमूर्ती बी.आर. गवई (B.R.Gawai) यांना सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस केलीयं. न्यायमूर्ती बी.आर.गवई 14 मे 2025 रोजी शपथ घेणार असून संजीव खन्ना 13 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.
आमदाराचा पीए असलो तरी 30 हजार मानधनात… मंगेशकर रुग्णालयाचे दावे भिसे कुटुंबाने फेटाळले
मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना 13 मे रोजी सेवानिवृत्त होणार असून दुसऱ्याच दिवशी बी. आर. गवई मुख्य न्यायाधीशपदाचा पदभार स्विकारणार आहेत. गवई हे देशातील दुसरे सरन्यायाधीश असणार आहे. याआधी न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन पहिले दलित मुख्य न्यायाधीश बनले होते.
मलाही काकांचा आशीर्वाद घ्यावा लागतो; अजित पवारांनंतर रोहित पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बी. आर. गवई यांना शपथ देणार असून न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या सेवानिवृत्तीनंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी नोव्हेंबर 2024 पासून पदभार सांभाळला. भूषण रामकृष्ण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 अमरावती येथे झाला. 16 मार्च 1985 रोजी त्यांचा बारमध्ये समावेश झाला.