भिसे कुटुंबाला न्याय मिळाला पण दोन मुलींचं काय? आमदार गोरखेंची मंगेशकर रूग्णालयाकडे एक मागणी

Deenanath Mangeshkar Hospital कडे आमदार अमित गोरखे यांनी भिसे कुटुंबाच्या प्रकरणात मोठी मागणी केली आहे.

WhatsApp Image 2025 04 17 At 11.16.27 PM

Justice to Bhise family but MLA Amit Gorkhe Demand to Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) वेळेत उपचार मिळाले नाहीत म्हणून तनिषा भिसे या (Tanisha Bhise) गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेची सध्या चौकशी सुरू आहे. त्यातच आता उपचाराअगोदर पैशांची मागणी करणारे डॉक्टर सुश्रुत दिलीप घैसास यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यावर आमदार अमित गोरखे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्यांनी एक मागणी केली आहे.

काय म्हणाले अमित गोरखे?

त्यांनी सांगितले की, घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाला कळलं. निष्काळजीपणा हा गुन्हा दाखल झाला. ही मृत मातेची ही लढाई होती. एका चुकीमुळे तिचा जीव गेला. खऱ्या अर्थाने साडे पाच तास ती तिथं होती. अहवाल आला त्यात दोषींवर गुन्हा दाखल झाला.आम्ही आभार मानतो सरकारचे तातडीनं समिती नेमून कारवाई झाली.डॉ घैसास हेच दोषी सुरवाती पासून होते. मॅनेजमेंट ने पण हे मान्य केलं होत. तसेच आता मंगेशकर हॉस्पिटल यांनी या दोन मुलीचे दायित्व घ्यावं अशी माझी सुरुवातीपासून मागणी आहे,ते त्यांनी करावे. अशी मागणी यावेळी गोरखे यांनी केली.

कामाचं बोला…, ठाकरे बंधूंच्या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भडकले

सूर्या किंवा इतर हॉस्पिटल दोषी यात नाही,अस असत तर मुली पण राहिल्या नसत्या. सगळ्या अहवालावर आम्ही कायदेशीर सगळे माहिती घेऊन पुढील कारवाई करू. माझ्या भूमिकेत बदल असता तर समोर आलो नसतो. IVF करा अस सागितले होते. जे चार पाच आवहाल पाहून हॉस्पिटल दोषी असेल तर कायदेशीर जाऊ तर कारवाई मागणी करू. अहवाल वाचून माझी भूमिका सांगेन. माझ्यावर कोणाचे प्रेशर नाही, मुख्यमंत्री मला न्याय देऊ अस सांगितले होते. जे कलम आहे त्यावर अटक होण्याची मागणी करू. दीनानाथ कर्मचारी दोषी आहे म्हणजे हॉस्पिटल दोषी आहे. १०० टक्के दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल दोषी आहे त्याच्यावर कारवाई व्हावा,आज मुख्यमंत्री यांनी केलेल्या कारवाई वर मी समाधानी आहे. मला शेवटचे आवहाल वाचू द्या मग पुढचे पाऊल उचलू. घैसास यांना दोषी ठरवा तसे ठरवले आहे.कालचे प्रेशर मोठ होत.आम्ही समाधानी आहोत कुटुंब म्हणून असं देखील भिसे कुटुंबाने म्हटलं आहे.

follow us