Download App

Patanjali Ayurveda : जाहिरातींद्वारे दिशाभूल, ‘पतंजली’ची सुप्रीम कोर्टात बिनशर्त माफी

Patanjali Ads Case : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयु्र्वेद कंपनीने आपल्या उत्पादनांबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात माफी मागितली आहे. योगगुरू बाबा रामदेव यांची (Baba Ramdev) कंपनी पतंजली आयुर्वेद आणि या कंपनीचे (Patanjali Ayurveda) व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण (Acharya Balkrishna) यांनी सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी (Supreme Court) मागितली आहे. न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी म्हटले आहे, की कंपनीच्या अपमानकारक वक्तव्यांचा आम्हाला खेद होतो. आता पुन्हा अशी चूक आम्ही करणार नाही.

2024 च्या निवडणुकीबाबत बाबा रामदेव यांचा मोठा दावा, विरोधकांच्या येणार ‘एवढ्या’ जागा?

या प्रकरणी न्यायालयाने बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना 2 एप्रिलला प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले आहे. याआधी न्यायालयाने या दोघांनाही अवमान नोटीस बजावली होती. तसेच दोन आठवड्यांत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. आयएमएने दाखल केलेल्या एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे आदेश दिले होते. या याचिकेत बाबा रामदेव यांच्यावर लसीकरण मोहिम आणि आधुनिक औषधांविरोधात मोहिम चालवली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

याआधी न्यायालयाने आधीच्या नोटिसांवर उत्तर दिले नाही म्हणून पतंजली आयुर्वेद आणि आचार्य बाळकृष्ण यांना चांगलेच फटकारले होते. यावरही न्यायालयाने नोटीस जारी करत न्यायालयाचा अवमान केला म्हणून तुमच्याविरुद्ध कारवाई का करू नये असा सवाल विचारला होता.

न्यायालयाने याआधीही नोटीस जारी करत बाबा रामदेव यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. तीन आठवड्यात उत्तर द्या असे निर्देश बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना दिले होते. तसेच जाहिरात छपाईवरही बंदी घातली होती. यानंतर कंपनीने कोर्टात हमीपत्र दाखल केले होते. तरीसुद्धा उत्पादनांवर जाहिरात छापण्यात आली. यावर न्यायालयाने मात्र कठोर धोरण स्वीकारले. या जाहिरातीत बाबा रामदेव यांचा फोटो होता म्हणून त्यांचाही समावेश करण्यात आला.

सोपा विषय : सुप्रीम कोर्टाचा ‘पतंजली’ला जबर दणका; रामदेव बाबांनाही झाप झाप झापलं, नेमकं प्रकरण काय?

नेमकं काय आहे प्रकरण?

बाबा रामदेव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोविड-19 च्या लसीकरण आणि आधुनिक औषधांविरोधात बदनामीची मोहीम चालवल्याचा आरोप करून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अॅलोपथीची विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न रामदेव बाबांच्या जाहिरातींमधून होत होता. यावर न्यायालयानेही त्यांना प्रश्न विचारले होते. त्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पंतजलीला त्यांच्या उत्पादनांविषयी आणि त्यांच्या परिणामकारकतेविषयी फसवे दावे बंद करण्यास सांगितले होते, तसेच प्रत्येक दाव्यामागे एक कोटी दंड आकारण्याचा इशाराही दिला होता.

follow us

वेब स्टोरीज