Baba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) बाबा रामदेव यांच्या पतंजलीला (Delhi High Court) नोटीस बजावली आहे. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला देखील नोटीस बजावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबा रामदेव आणि पतंजलीच्या दिव्या फार्मसीला नोटीस बजावण्यात आली आहे.
माहितीनुसार, दिव्या दंत मंजन (Divya Dant Manjan) या हर्बल टूथ पावडर शाकाहारी ब्रँड म्हणून कथितपणे सादर केल्याबद्दल पतंजलीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि पतंजलीच्या दिव्या फार्मसीला नोटीस बजावली आहे.
या याचिकेत याचिकाकर्त्याच्या वकिलांनी दावा केला आहे की, दिव्य दंत मंजन ग्रीन डॉट म्हणजेच शाकाहारी म्हणून विकले जात आहे मात्र यामध्ये माशांचा अर्क आहे, जो एक मांसाहारी घटक आहे. त्यामुळे बाबा रामदेव यांच्या पतंजलीने ग्राहकांची फसवणूक केल्याने कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
याचिकाकर्त्याच्या वकिल स्वप्नील चौधरी आणि प्रशांत गुप्ता म्हणाले की, या उत्पादनात “समुद्री फोम (सेपिया ऑफिशिनालिस)” आहे, जो माशांच्या अर्कापासून तयार होतो. त्यामुळे जे धार्मिक श्रद्धा आणि विश्वासामुळे फक्त शाकाहारी पदार्थ/उत्पादने वापरतात त्यांचीही फसवणूक आहे.
याचिकेत पुढे म्हटले आहे की, बाबा रामदेव यांनी YouTube व्हिडिओमध्ये कबूल केले आहे की उत्पादनामध्ये वापरलेले “समुद्र फेन” हे प्राणी-आधारित आहे, मात्र तरीही या उत्पादनाची विक्री शाकाहारी म्हणून करण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांना न कळत मांसाहारी उत्पादनाचा सेवन करावा लागत आहे.
विधानसभेपूर्वी काँग्रेसला मोठा झटका, आमदार जितेश अंतापूरकरांचा भाजपमध्ये प्रवेश
या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) तसेच पतंजली, दिव्या फार्मसी, योग गुरु रामदेव आणि इतर संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे.