रायपूर : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांबद्दल (Sant Tukaram Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज (Bageshwar Baba) पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. संत तुकाराम महाराजांबद्दल त्यांनी केलेल्या विधानावर आता राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी दररोज मारहाण करीत होती, म्हणून त्यांनी देवाचा धावा केल्याचं विधान केलंय. त्यांच्या या विधानाचा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीनंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनही निशेष व्यक्त करण्यात आला आहे.
काय म्हणाले बागेश्वर महाराज?
जगद्गुरु संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारलं, तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर तुकाराम म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे. त्यानंतर ती व्यक्ती म्हणाली यामध्ये देवाची कृपा कशी काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, अरे वा… प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो.
भक्तीत लीन झालो नसतो. पत्नीच्या प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्याने देव मला त्याची सेवा करण्याची संधी तर देतो. प्रभू रामाच्या चरणी लीन होण्याची संधी तर देतोय, असं तुकाराम महाराजांनी म्हंटल्यांच बागेश्ववर महाराजाने विधान केलंय.
दरम्यान, बागेश्वर महाराजांच्या या वादग्रस्त विधानाचा भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी बागेश्वर बाबाचा निषेध नोंदवला असून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीदेखील जाहीरपणे निषेध व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अंधश्रध्दा पसरविण्याबाबतचे आरोप बागेश्वर बाबावर अंनिसचे श्याम मानव यांनी केले होते. त्यातून पोलिसांकडून क्लीनचीट मिळताच बागेश्वर बाबांनी हे वादग्रस्त विधान केल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंच्या वक्तव्यावर त्यांच्याविरोधात आंदोलने करण्यात आली होती. आता बागेश्वर बाबाविरोधातही आंदोलने करणार का? सवाल सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.