Download App

बसपाचा नवा ‘बॉस’ ठरला! लोकसभा निवडणुकीपूर्वी मायावतींकडून उत्तराधिकाऱ्याची घोषणा

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या (Bahujan Samaj Party) अध्यक्षा मायावती (Mayawati) यांनी त्यांचा भाचा आकाश आनंद (Akash Anand) यांची उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली आहे. रविवारी (10 डिसेंबर) बसपाचे प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हा नेत्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. सभेत मायावतींनी ही मोठी केली. मायावती मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे सार्वजनिक जीवनातून बाजूला झाल्या होत्या. पूर्वीप्रमाणे निवडणूक सभांमध्येही त्या उपस्थित राहत नव्हत्या. या पार्श्वभूमीवर आकाश आनंदसारख्या तरुण चेहऱ्यावर मायावती यांनी मोठी जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे. (Bahujan Samaj Party (BSP) chief Mayawati on Sunday named nephew Akash Anand as her successor.)

नुकत्याच पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आकाश आनंद यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. आकाश आनंद यांनी राजस्थानपासून मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडपर्यंत पक्षाला मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मायावतींनी आकाश आनंद यांची उत्तराधिकारी म्हणून घोषणा केली आहे. दरम्यान, बसपा देशाच्या सार्वत्रिक निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचे मायावती यांनी यापूर्वी जाहीर केले होते. पण आता आकाश आनंद युतीबाबत काही निर्णय घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dheeraj Sahu : आतापर्यंत 300 कोटींचं घबाड जप्त, पण या पैशांचे पुढे काय होते?

कोण आहे आकाश आनंद?

आकाश आनंद हे मायावतींचे बंधू आनंद कुमार यांचे सुपुत्र आहे. त्यांनी लंडनमधून मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) चे शिक्षण घेतले आहे. मायावतींनी त्यांना 2017 मध्ये सहारनपूरच्या सभेतून राजकारणात आणले होते. तेव्हापासून त्यांच्याकडे मायावतींचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जाऊ लागले होते. अखेर रविवारी त्यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली. नेहमी परिवारवादाच्या विरोधात बोलणाऱ्या मायावतींनी कधीही आपला भाऊ आनंद कुमार यांना प्राधान्य दिले नाही. पण, वारशाचे राजकारण करण्यासाठी त्यांनी आपला भाचा आकाश आनंदला पुढे केले आहे.

Sukhdev Singh Gogamedi : पाच दिवस गुंगारा दिला पण, ‘त्या’ फोटोने गोगामेडींचे मारेकरी झाले गजाआड

पक्षाची स्थिती सातत्याने कमकुवत होत आहे :

मागील काही दिवसांपासून बहुजन समाज पक्षाची ताकद सातत्याने कमी होत गेली आहे. अनेक नेत्यांनी पक्ष सोडला. उत्तरप्रदेशमधील 2017 आणि 2022 च्या निवडणुका, 2019 मधील लोकसभांच्या निवडणुका यात पक्षाची अत्यंत निराशजनक कामगिरी राहिली. 2019 मध्ये सपासोबत युती करून बसपाला अवघ्या 10 जागा जिंकता आल्या होत्या. पण आता आकाश आनंद यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर परिस्थिती किती बदलणार? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जाऊ लागला आहे.

Tags

follow us