Download App

बसपाच्या ‘किंग’ पुन्हा मायावतीच; राष्ट्रीय कार्यकारणीचा निर्णय, पोटनिवडणुकीत उमेदवारांची घोषणा

बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची कमान पुन्हा एकदा मायावती यांच्यावर सोपवण्याचा निर्णय राष्ट्रीय कार्यकारणीकडून घेण्यात आलायं.

Mayavati : बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची कमान पुन्हा एकदा मायावती (Mayavati) यांच्यावर सोपवण्यात आलीयं. बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आलायं. पुढील पाच वर्षांसाठी मायावती बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असणार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव सतिश चंद्र यांनी मायावती यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याबाबतचा प्रस्तावर दिला होता.

‘बिग बॉस मराठी’च्या घराची मी महाराणी’; निक्कीच्या वक्तव्यावर जान्हवी अन् अरबाज म्हणाले…

मायावती यांची 18 सप्टेंबर 2003 पासून राष्ट्रीय अध्यक्षपदी केली जात आहे. काही दिवसांपासून मायावती राजकीय संन्यास घेणार असल्याची माहिती समोर आली होती. या माहितीचं खंडन करीत त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी राहणार असल्याचं सांगितलंय.

अरिजित सिंग बनला नंबर 1 गायक, Spotify वर परदेशी पॉप गायिका टेलर स्विफ्टला टाकले मागे

लखनऊमध्ये मंगळवारी बसपाच्या कार्यालयात राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसह उत्तर प्रदेशातील 10 जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकांबाबत चर्चा झाली.

सहा महिन्यात पुतळा तयार; शिल्पकाराने आयुष्यात पहिल्यांदा मोठा पुतळा उभारला !

बसपाकडून पोटनिवडणुकीबाबत कोणतीही भूमिका घेण्यात आली नव्हती, मात्र आता 10 विधानसभेच्या जागांवरील पोटनिवडणुकांबाबत बसपा अॅक्शन मोडवर उतरलीयं. या दहा जागांवर बसपा निवडणूका लढवणार असल्याची घोषणाही करण्यात आलीयं. यामध्ये मीरापूर विधानसभा मतदारसंघातून खासदार चंद्रशेखर आझाद यांचे निकटवर्तीय नेते प्रधान शाह यांना तर मिल्कीपुर विधानसभा मतदारसंघात रामगोपाल कोरी यांना उमेदवारीची घोषणा करण्यात आलीयं.

follow us