सध्या चर्चा कॉकरोच जनता पार्टीची पण, जगभरात गाढव-हत्ती चिन्ह असलेल्या पक्षांनीही रचलाय इतिहास

Political Parties And Their Animal Symbols झुरळ जनता पार्टीने ऑनलाइन जगात खळबळ उडवून दिली आहे. या पक्षाला मिळणारा पाठिंबा सातत्याने वाढत आहे.

  • Written By: Published:
सध्या चर्चा कॉकरोच जनता पार्टीची पण, जगभरात गाढव-हत्ती चिन्ह असलेल्या पक्षांनीही रचलाय इतिहास

Global Political Parties And Their Party Animal Symbols : सध्या सोशल मीडिया आणि इंटरनेटवर क्रॉकोज जनता पार्टीने अक्षरक्षः धुमाकूळ घातला आहे. सरकारविरोधी मीम्स आणि धारदार उपरोधाच्या जोरावर या डिजिटल पक्षाने तरुणांमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. या कॉकरोच जनता पार्टीचे राजकीय भविष्य काय असेल हे माहीत नाही पण, जगभरात असे काही राजकीय पक्ष आहेत ज्यांच्या पक्षांचे चिन्हे प्राण्यांवर आधारित आहेत. चला तर मग जाणून घेऊया राजकारणातील या ‘अॅनिमल किंगडम’बद्दल…

अमेरिकेत गाढव आणि हत्तीने रचला इतिहास

सुरूवात आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या अमेरिकेपासून करूया. जगात सर्वात जुनी आणि शक्तिशाली लोकशाही असलेल्या अमेरिकेत दोनच पक्षांचा दबदबा आहे आणि या दोन्ही पक्षांची चिन्हे प्राण्यांशी जोडलेली आहेत. अमेरिकेत डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन पार्टी असे दोनच राजकीय पक्ष आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे चिन्ह गाढव तर, रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह हत्ता आहे. या चिन्हातील पहिला प्राणी म्हणजे गाढव हा जिद्दी आणि मजबूत इराद्याचा प्रतीक मानला जातो. डेमोक्रॅटिक पक्ष हा जगातील सर्वात जुन्या आणि आजही कार्यरत असलेल्या राजकीय पक्षांपैकी एक आहे. या पक्षाला गरीब, कामगार, अल्पसंख्याक आणि उदारमतवादी विचारांचा पक्ष म्हटले जाते. बराक ओबामा आणि फ्रँकलिन रूजवेल्ट हे याच पक्षाचे राष्ट्राध्यक्ष होते.

तर, दुसऱ्या रिपब्लिकन पक्षाचं चिन्ह आहे हत्ती. अब्राहम लिंकन यांचा पक्ष, ज्याने गुलामगिरी संपुष्टात आणली, तो व्यापार, सैन्य, कमी कर आणि पारंपरिक मूल्यांच्या समर्थनासाठी ओळखला जात होता. डोनाल्ड ट्रम्प याच पक्षाचे आहेत. हत्ती हा ताकद आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. 19 व्या शतकात एका कार्टूनिस्टने या दोन्ही पक्षांची चिन्हे लोकप्रिय केल्याचे सांगितले जाते. आता ही चिन्हे जगभर ओळखली जातात.

अमेरिकेत इतर पक्षांचेही प्राण्यांशी नाते

आता हे झाले अमेरिकेतील प्रमुख दोन राजकीय पक्षांच्या चिन्हाबाबत पण, अमेरिकेत केवळ दोन पक्षांचे प्राण्यांशी नाते आहे तर, नाही. येथे असलेल्या प्रोहिबिशन पक्षाचे चिन्ह ‘उंट’ होते उंट कमी पाणी पितो आणि हा पक्ष दारूबंदी लढणारा पक्ष आहे. याशिवाय कॉन्स्टिट्यूशन पक्षाचे चिन्ह ‘गंजा ईगल’ जो अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी आहे. मॉर्न व्हिग पक्षाचे चिन्ह बुद्धीचे प्रतीक असलेला ‘उल्लू’ म्हणजेच घूबड आहे. तर, अमेरिकन सॉलिडॅरिटी पक्षाचे चिन्ह ‘पेलिकन’ पक्षी असे आहे.

रशियात ‘भालू’ तर आफ्रिकेत ‘शार्क अन् गाय’

व्लादिमीर पुतिन यांच्या समर्थनाने बनलेल्या रशियातील सर्वात शक्तिशाली पक्ष ‘यूनाइटेड रशिया पार्टी’चे चिन्ह ‘भालू’ (रशियन अस्वल) आहे.
अस्वलाला रशियाचे राष्ट्रीय प्रतीक मानले जाते. ते सामर्थ्य आणि विशालतेचे प्रतीक आहे. हा रशियातील सर्वात शक्तिशाली पक्ष आहे. व्लादिमीर पुतिन यांच्या पाठिंब्याने 2001 मध्ये स्थापन झालेला हा रशियातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. रशियन संसदेत या पक्षाकडे 320 पेक्षा जास्त जागा आहेत. दक्षिण आफ्रिकेतील कॅपिटलिस्ट पार्टीचे चिन्ह ‘बैंगनी गाय’ आहे, तर ‘इंकाथा फ्रीडम पार्टी’चे चिन्ह तीन हत्ती आहेत.

घानामध्ये, कन्व्हेन्शन पीपल्स पार्टीचे चिन्ह लाल कोंबडा तर, झिम्बाब्वेमधील माट पार्टीचे चिन्ह सांकोफा पक्षी आहे. नायजेरियामधील सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचे चिन्ह पांढरा घोडा तर, अगानो पार्टीचे चिन्ह कोकरू आहे. केन्यातील शारिकिशो पक्षाचे चिन्ह शार्क आहे. नॅशनल लिबरल पार्टीचे चिन्ह जिराफ असून, केनिया आफ्रिकन नॅशनल युनियनचे चिन्ह कोंबडा आहे.

आशियाई देशांमध्ये ‘मोर, वाघ अन् पवित्र गाय’

भारताच्या शेजारील देशांमध्येही राजकीय पक्षांनी प्राण्यांना आपला चेहरा बनवले आहे. यात नेपाळमधील ‘राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी’चे चिन्ह पवित्र ‘गाय’ आहे. तर, म्यानमारमधील आंग सान सू की यांच्या ‘नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी’चे चिन्ह ‘मोर’ आहे. याशिवाय इंडोनेशियतील एका प्रमुख पक्षाचे चिन्ह ‘लाल डोळ्यांचा बैल’ तर दुसऱ्या पक्षाचे चिन्ह ‘गरुड’ आहे.

भारतीय राजकारणातही प्राण्यांची ‘शक्ती’

भारतात निवडणूक आयोगाने प्राण्यांच्या चिन्हांचा वापर करण्यावर आता काही मर्यादा आणल्या असल्या, तरी जुनी चिन्हे आजही कायम आहेत. यात बसपा आणि आसाम गण परिषद यांचे अधिकृत चिन्ह ‘हत्ती’ आहे. याशिवाय शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह ‘वाघ’ आहे. एकूण काय तर, अभिजित दिपके यांनी सुरू केलेल्या पक्षामुळे इंटरनेटवर जरी आज ‘कॉकरोच पार्टी’चा ट्रेंड नवा असला, तरी राजकीय पक्ष आणि त्यांच्या असलेल्या चिन्हांमुळे प्राण्यांशी असलेला संबंध हा शतकानुशतके जुना आणि रंजक आहे.

follow us