Download App

न्यायालयांना सिद्धांतांचा विसर पण मी… सिसोदिया अन् के. कविता केसवरून मुख्य न्यायधीशांचे ताशेरे

Chief Justice B R Gavai यांनी मनीष सिसोदिया आणि के. कविता यांच्या केसचा उल्लेख करत भारतीय न्यायव्यवस्थेवर ताशेरे ओढले आहेत.

Bail rules and jail exceptions courts forgetting principle; Chief Justice’s rebuke on Sisodia and K. Kavita case: देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश बी आर गवई यांनी भारतीय न्यायव्यवस्थेवर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी आपचे नेते मनीष सिसोदिया आणि के. कविता यांच्या केसचा उल्लेख करत न्यायालयांना बेल नियम अन् जेल अपवाद या सिद्धांताचा विसर पडला असल्याचं म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले गवई?

गवई यांचं म्हणणं आहे की, देशाचे मुख्य न्यायधिश भूषण रामकृष्ण गवई यांचं म्हणणं आहे की, बेल नियम अन् जेल अपवाद या सिद्धांताचा गेल्या काही दिवसांपासून न्यायालयांना विसर पडला आहे. केरळ उच्च न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्हिआर कृष्ण अय्यर मेमोरियल लेक्चरमध्ये त्यांनी या बद्दल प्रतिक्रिया दिली.

व्हिट्स हॉटेल प्रकरण विधानसभेत पेटलं; आंबादास दानवेंकडून शिरसांटावर वार, फडणवीसांचा कारवाईचा शब्द

ते म्हणाले की, बेल नियम अन् जेल अपवाद या सिद्धांताचा गेल्या काही दिवसांपासून न्यायालयांना विसर पडला आहे. मात्र मी मनीष सिसोदिया, प्रबिर पुरकायस्थ आणि के. कविता यांच्या केसमध्ये मी त्याची आठवण करून दिली. तसेच न्यायमुर्ती कृष्ण अय्यर यांचं स्पष्ट म्हणणं होतं की, अंडरट्रायल सुरू असलेल्या लोकांना सुनावणी न घेता जेलमध्ये ठेवले जाऊ नये.

OYO Hotel मध्ये एका तासासाठी भाड्याने रुम, भाजप आमदार मुनगंटीवारांचा गंभीर आरोप

अय्यर हे चौकटीबाहेर जाऊन काम करणारे न्यायधीश होते. त्यांनी अनेक नियम लागू केले. जे टॅबू मानले जात होते. त्यांनीच बेल नियम अन् जेल अपवाद हा सिद्धांत काटोकार पाळण्यावर भर दिला. पण या सिद्धांताचा गेल्या काही दिवसांपासून न्यायालयांना विसर पडला आहे. पण आनंद आहे की, मला ही संधी मनीष सिसोदिया आणि के. कविता यांच्या केसमध्ये मिळाली की, हे सिद्धांत पुन्हा लागू केले गेले.

follow us