Download App

Balochistan : पाकिस्तानचे आता तीन तुकडे? बलोच लिबरेशन आर्मीच्या नेत्याची मोठी घोषणा…

बलोच नेता मीर यार बलोच याने रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानची घोषणा करीत पाकिस्तानापासून स्वातंत्र्य झाल्याची घोषणा केलीयं.

Balochistan : भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असतानाच आता बलुचिस्तानने (Balochistan ) डोक वर काढलंय. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा बलोच लिबरेशन आर्मीकडून करण्यात आलीयं. बलोच नेता मीर यार बलोच याने रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानची घोषणा करीत पाकिस्तानापासून स्वातंत्र्य झाल्याची घोषणा केलीयं. सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा ट्रेंड सुरु आहे.

‘अहिल्यानगर’च्या गौरव दिनानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा; जनसेवा फाऊंडेशनचा उपक्रम

मीर यार बलोच एक लेखक असून स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढणाऱ्या बलोच लिबरेशन आर्मीचा तो नेताही आहे. पाकिस्तानापासून बलुचिस्तान स्वातंत्र्य झाल्याचं त्यांनी घोषित केलं असून यासोबतच दिल्लीत बलुचिस्तानचे स्वतंत्र उच्चायुक्त सुरु करण्यात यावे, अशी मागणीही मीर यार बलोच यांनी केलीयं. तसेच संयुक्त राष्ट्रांनी आपली शांती सेना बलुचिस्तानमध्ये पाठवून पाकच्या सैन्याला त्यांच्या सीमेमध्ये पाठवण्याची मागणी त्यांनी केलीयं.

PM मोदी अन् भारतीय सैन्याचा वर्मी घाव, ट्रम्प तात्यांचा पडला भाव; ‘त्या’ दोन घटनांनी चित्रच पालटलं

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करीत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची अड्डे उध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले करीत प्रत्युत्तर दिलं. तब्बल 86 तास चाललेल्या युद्ध मोहिमेत भारताचं कमी पण पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या युद्धादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याने दोन्ही देशांकडून युद्धविराम देण्यात आला. त्यानंतर आता पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवादावरच पाकिस्तानसोबत चर्चा करणार असल्याची भूमिका भारताने स्पष्ट केलीयं

follow us