‘अहिल्यानगर’च्या गौरव दिनानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा; जनसेवा फाऊंडेशनचा उपक्रम

Ahilyanagar News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अहिल्यानगर गौरव दिनाचं आयोजन अहिल्यानगरमध्ये करण्यात आलंय. जनसेवा फाऊंडेशन आणि विचार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर गौरव दिन आणि पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवांतर्गत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्या आली असल्याची माहिती संयोजन समितीचे विशारद पेटकर यांनी माहिती दिलीयं.
ब्रेकिंग : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर टरकलेल्या पाकिस्तानने BSF जवानाला 20 दिवसांनी सुखरूप सोडलं
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक आणि अंतिम अशा फेऱ्या आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह 18 वर्षांपुढील स्पर्धेकांसाठई ही स्पर्धा खुली असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक कुशल प्रशासक, त्यांचं धार्मिक कार्य, महिला सबलीकरणाचे प्रतिक आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रतिक असे विषय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी देण्यात आले आहेत.
तुमचा आजचा दिवस कसा जाणार? एका क्लिकवर जाणून घ्या वाच आजचे राशी भविष्य
दरम्यान, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी स्पर्धकांना वरीलप्रमाणे दिलेल्या विषयावर पाच मिनिटांचा स्वत:च्या भाषणाचा व्हिडिओ तयार करुन संयोजन समितीकडे 16 मे रोजी पर्यंत पाठवण्यात यावा, असं आवाहनही संयोजन समितीकडून करण्यात आलं असून स्पर्धेची अंतिम फेरी न्यू आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये होणार आहे. त्यामुळे या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावं, असंही आवाहन संयोजकांकडून करण्यात आलं आहे.