सर्दी आणि खोकल्याच्या औषधांवर बंदी ; 4 वर्षांखालील मुलांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Chlorpheniramine Maleate : केंद्र सरकारने लहान मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, सरकारने चार

Cold And Cough Medicines

Cold And Cough Medicines

Cold And Cough Medicines : केंद्र सरकारने लहान मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, सरकारने चार वर्षांखालील मुलांसाठी असलेल्या सर्दी आणि खोकल्याच्या औषधांवर बंदी घातली आहे. माहितीनुसार, ‘क्लोर्फेनिरामाइन मॅलेट’ (Chlorpheniramine Maleate) आणि ‘फिनाइलफ्राइन हायड्रोक्लोराइड’ (Phenylephrine Hydrochloride) असलेली सर्व ‘फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन्स’ (FDCs) जी पारंपारिकपणे सामान्य सर्दीवर उपचारांसाठी दिली जातात त्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मुलांची सुरक्षा आणि संभाव्य दुष्परिणामांविषयीच्या गंभीर तक्रारी लक्षात घेऊन सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या दोन घटकांचा समावेश असलेल्या सर्व FDC औषधांवर स्पष्ट चेतावणी देणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही औषधे चार वर्षांखालील मुलांसाठी वापरली जाऊ नयेत. ही चेतावणी औषधाचे लेबल, पॅकेजमधील माहितीपत्रक (पॅकेज इन्सर्ट) आणि कोणत्याही जाहिरात साहित्यावर स्पष्टपणे दिसली पाहिजे असं सरकारकडून सांगण्यात आले आहे. ‘ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट, 1940’ च्या कलम 26A अन्वये सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी सरकारने ही अधिसूचना जारी केली. अधिकृत शासन पत्र (गॅझेट) प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून हा आदेश लागू झाला.

DTAB च्या शिफारशींवर आधारित निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, तज्ज्ञ समिती आणि ‘ड्रग्ज टेक्निकल ॲडव्हायझरी बोर्ड’ (DTAB) यांच्या शिफारशींच्या आधारे सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या मते, या औषधांच्या मिश्रणामुळे चार वर्षांखालील मुलांसाठी धोके निर्माण होऊ शकतात, तर या वयोगटासाठी तुलनेने सुरक्षित पर्याय उपलब्ध आहेत. यापूर्वी, 15 एप्रिल 2025 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे ‘क्लोर्फेनिरामाइन मॅलेट’ आणि ‘फिनाइलफ्राइन हायड्रोक्लोराइड’ असलेल्या विशिष्ट FDCs साठी वयाशी संबंधित अशीच चेतावणी अनिवार्य करण्यात आली होती. आता सरकारने या तरतुदीची व्याप्ती वाढवून, या दोन घटकांचा समावेश असलेल्या सर्व औषध प्रकारांचा (फॉर्म्युलेशन्स) त्यात समावेश केला आहे.

माझे काम ट्रॉफी जिंकणे, ‘लाईक्स’ आणि ‘व्ह्यूज’ मिळवणे नाही; गौतम गंभीर स्पष्टच म्हणाला –

उत्पादकांनी चेतावणी देणे आवश्यक

“हे ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ चार वर्षांखालील मुलांसाठी वापरले जाऊ नये.” अशी चेतावणी उत्पादकांसाठी औषधांवर स्पष्ट भाषेत छापणे आवश्यक आहे.  औषध कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांच्या लेबल्स आणि पॅकेजिंगवर स्पष्ट चेतावणी छापण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, ज्यामध्ये नमूद असेल की हे औषध चार वर्षांखालील मुलांसाठी नाही.

Exit mobile version