Download App

मोठी बातमी! 1 एप्रिलपासून बँकिंग नियमांमध्ये होणार बदल, आताच जाणून घ्या सर्वकाही

New Rules From 1 April 2025 : देशात 1 एप्रिल 2025 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार असून या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून बँकिंग

  • Written By: Last Updated:

New Rules From 1 April 2025 : देशात 1 एप्रिल 2025 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार असून या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून बँकिंग नियमांमध्ये बदल होणार आहे. या बदलाचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होताना दिसणार आहे. त्यामुळे देशात 1 एप्रिल 2025 पासून बँकिंग क्षेत्रात कोणत्या नियमांमध्ये (New Rules From 1 April 2025) बदल होणार आहे. याची माहिती असणे आवश्यक आहे. देशात 1 एप्रिल 2025 पासूनएटीएममधून पैसे काढणे, किमान शिल्लक रक्कम, चेक पेमेंट सुरक्षा, डिजिटल बँकिंग, बचत खाते आणि मुदत ठेव (एफडी) व्याजदर तसेच क्रेडिट कार्ड सर्विसच्या नियमांमध्ये बदल पाहायला मिळणार आहे.

एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल

1 एप्रिल 2025 पासून ग्राहकांना दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून (ATM) फक्त तीन वेळा मोफत पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. यानंतर तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर अतिरिक्त 20 ते 25 रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. यापूर्वी दुसऱ्या एटीएममधून पाच वेळा मोफत पैसे काढण्याची सुविधा देण्यात येत होती मात्र 1 एप्रिलपासून ग्राहकांना दुसऱ्या एटीएममधून फक्त तीन वेळा मोफत पैसे काढता येणार आहे.

किमान शिल्लक नियमांमध्ये बदल

तर दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) , पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आणि कॅनरा बँक (Canara Bank) सह अनेक मोठ्या बँक 1 एप्रिलपासून किमान शिल्लक ठेवण्याच्या नवीन अटी लागू करणार आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागानुसार ग्राहकांना किमान शिल्लक ठेवावी लागणार आहे आणि जर किमान शिल्लक ठेवली नाही तर ग्राहकांवर दंडाची कारवाई होणार आहे.

बचत खाते आणि एफडीच्या व्याजदरात बदल

1 एप्रिल 2025 पासून अनेक बँकांनी बचत खाती आणि मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल जाहीर केले आहेत. त्यानुसार खात्यात जमा केलेल्या रकमेच्या आधारावर व्याजदर ठरवले जाणार आहे. याता फायदा ग्राहकांना होण्याची शक्यता आहे कारण मोठ्या प्रमाणात रक्कम ठेवणाऱ्या जास्त व्याज मिळू शकतो.

पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू होणार

तर 1 एप्रिलपासून ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम म्हणजेच पीपीएस लागू होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना 5000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या चेक पेमेंटसाठी चेक नंबर, तारीख, लाभार्थीचे नाव आणि रक्कम पडताळावी लागणार आहे. या प्रक्रियेमुळे चुकीचे पेमेंट आणि फसवणूक रोखण्यास मदत होणार आहे.

क्रेडिट कार्ड सुविधांमध्ये कपात 

1 एप्रिल 2025 पासून एसबीआय आणि आयडीएफसी फर्स्ट बँक विस्तारा क्रेडिट कार्डचे फायदे देखील बदलणार आहे. तिकीट व्हाउचर, रिन्यूअल फायदे आणि माइलस्टोन रिवॉर्ड्स यासारख्या सुविधा बंद केल्या जाणार आहे. तर 18 एप्रिल 2025 पासून अ‍ॅक्सिस बँक त्यांच्या विस्तारा क्रेडिट कार्डवरही असेच बदल लागू करणार आहे.

हो…मी तुषार खरातांना ओळखते, सुप्रिया सुळेंनी केलं फडणीसांच्या आरोपांचं खंडन

डिजिटल बँकिंग सेवा

तर डिजिटल बँकिंग अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्यासाठी बँका नवीन ऑनलाइन सेवा आणि एआय-चालित चॅटबॉट्स सुरू करण्यात येणार आहे. याचबरोबर 1 एप्रिल 2025 पासून डिजिटल व्यवहार सुरक्षित करण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी मजबूत केली जाणार आहे.

follow us

संबंधित बातम्या