दिल्लीकरांना RO चे मोफत पाणी, केजरीवालांची ‘वॉटर एटीएम कार्ड’ योजना

दिल्लीकरांना RO चे मोफत पाणी, केजरीवालांची ‘वॉटर एटीएम कार्ड’ योजना

Water ATM Card : दिल्ली सरकारने लोकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आता दिल्लीत राहणाऱ्या कुटुंबांना वॉटर एटीएम कार्ड दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे. या कार्डद्वारे प्रत्येक व्यक्तीला दररोज 20 लिटर शुद्ध पाणी मिळेल. सरकारच्या या निर्णयामुळे गरीबातल्या गरीबालाही शुद्ध आरओचे पाणी पिणे शक्य होणार आहे. दोन हजार कुटुंबांना या कार्डचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अशी योजना राबणार
अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्लीतील दाट लोकवस्ती असलेल्या भागात लोकांना पाणी मिळत नाही. कारण पाण्याच्या पाइपलाइन तेथे पोहोचू शकत नाहीत. या भागात टँकरने पाणीपुरवठा केला जातो. यासाठी आता ट्यूबमधून पाणी काढले जाईल आणि ते आरओने शुद्ध केले जाईल. येथे टॅप बसवले जातील आणि प्रत्येक व्यक्तीला एक कार्ड दिले जाईल. या कार्डद्वारे प्रत्येक कुटुंबाला दररोज 20 लिटर आरओ शुद्ध पाणी मिळू शकते.

अफजल गुरूला फाशी दिल्यानंतर जेलर सुनील गुप्ता ढसाढसा रडले, संपूर्ण प्रकरण काय होते?

अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही पायलट प्रोजेक्ट अंतर्गत 4 वॉटर एटीएम सुरू केले आहेत. 2000 कुटुंबे याचा लाभ घेत आहेत. याशिवाय पहिल्या टप्प्यात 500 वॉटर एटीएम सुरू होणार आहेत. अरविंद केजरीवाल म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीला एक कार्ड दिले जात आहे, ज्या अंतर्गत ते दररोज 20 लिटर पाणी घेऊ शकतात.

Ind Vs WI : वेस्टइंडिजसाठी अश्विन पुन्हा ठरणार डोकेदुखी; सिराजचे मोठे वक्तव्य

अरविंद केजरीवाल म्हणाले की, पूर्वी जिथे पाण्याचे टँकर यायचे, तिथे पाण्यासाठी भांडण व्हायचे. ट्युब्युल बसवलेल्या ठिकाणी घाण पाणी यायचे, मात्र आता सरकारच्या या निर्णयामुळे लोकांची घाण पाण्यापासून सुटका होणार आहे. जिथे झोपडपट्ट्या आहेत, तिथे लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल अशी व्यवस्था केली जाईल, असे ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube