अफजल गुरूला फाशी दिल्यानंतर जेलर सुनील गुप्ता ढसाढसा रडले, संपूर्ण प्रकरण काय होते?
Sunil Gupta On Afzal Guru : कुख्यात आतंकवादी अफलज गुरुला फाशी दिल्यानंतर तत्कालीन जेलर सुनील गुप्ता यांच्या डोळ्यात पाणी आले होते. जेलर म्हणून त्यांनी करिअरमध्ये आठ कैद्यांची फाशी बघितली होती. यामध्ये अफजल गुरुचा समावेश होता. ते म्हणाले की जेलरदेखील एक माणूस असतो. अफजल गुरुला फाशी दिल्यानंतर माझे मन देखील भरुन आले होते.
सुनील गुप्ता म्हणाले की काही वर्षांनंतर एखादी फाशी दिली जाते. अफजल गुरुच्या फाशीच्या वेळी माझ्याकडे चार्ज देण्यात आला होता. मी हेडकॉर्टरमधून सुपरवाईज करत होतो. त्यांच्या घरच्यांना दोन दिवस आगोदर सांगण्यात आले होते की फाशी दिली जाणार आहे. पण त्याला ती चिठ्ठी मिळाली नव्हती. चिठ्ठी मिळाली तेव्हा त्याला फाशी दिली गेली होती. त्याच्या फाशीबद्दल लोकांना माहिती होऊ नये अशी आमची भूमिका होती. कारण ही गोष्ट खुप संवेदशील होती. मी संध्याकाळी तिथं पोहोचलो होतो. त्यानंतर जेलमध्ये फाशीची तयारी सुरु केली. सर्व काही नियमानुसार सुरु होते, असे सुनील गुप्ता यांनी सांगितले.
एक दिवस अगोदर आम्ही फाशी देण्याचा सराव करत होतो. कैद्याच्या वजनापेक्षा जास्त वजन त्या दोरीला लटकवले जाते आणि तिला एक झटका दिला जातो. पण आम्ही जेवढ्या दोऱ्या घेतल्या तेवढ्या दोऱ्या तुटल्या. यामध्ये चार दोऱ्या तुटल्या होत्या. फाशी देऊ शकलो नाही तर सरकारला काय उत्तर द्यायचे हा मला प्रश्न पडला होता. माझी नोकरी जाऊ शकत होती. जेलमध्ये खुप साऱ्या दोऱ्या असतात त्यामध्ये एक मजबूत दोरी भेटली आणि त्यावर आमची सहमती झाली. पण फाशी देण्यासाठी जल्लाद भेटत नव्हता. तिथं सर्व अधिकारी आणि पोलीस शिपाई होते. पूर्वी कोणाही फाशी देऊ शकत होते पण आता सरकारने जल्लाद असणे अनिवार्य केले आहे, असे सुनील गुप्ता यांनी सांगितले.
सावधान! तुम्हालाही येऊ शकतो खंडणीसाठी फोन; ‘अकिरा’ व्हायरसपासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी
दुसऱ्या दिवशी सकाळी अफजल गुरुकडे गेलो. मला पाहिल्यावर त्याला वाटले की आज काहीतरी होणार आहे. तो म्हणाला की ‘सर आज काय फाशी देत आहेत का?’ यावर मी म्हटले की ‘तुला कसं काय माहिती?’ तो म्हटला की ‘एकतर सकाळी सकाळी तुम्ही भेटलात आणि रात्री मला वेगळ्या जेलमध्ये बंद केले होते. रात्रीपासून माझ्यावर एक शिपाई लक्ष ठेऊन आहे.’ मी त्याला म्हटलं की ‘हो.. फाशी देणार आहेत,’ असे सुनील गुप्ता यांनी सांगितले.
तो म्हणला की ‘तुम्ही आला आहात तर मी तुमच्यासोबत चहा घेतो.’ त्यानंतर आम्ही चहा घेतला. त्यावेळी तो म्हणाला की मी आतंकवादी नाही. मी आतंकवादी असतो तर माझ्या मुलांना डॉक्टर नसते बनवले. मुलांना देखील आंतकवादी बनवले असते. पण मी नेहमी इमनादारीसोबत राहिलो आहे. माझे रेकार्ड चेक करा. मी पीयुसीएलचा सदस्य होतो. पीयुसीएलच्या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. देशाला मजबूत करण्यासाठी मी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढलो आहे. वाटलं तर तुम्ही विचारू शकता.’ यावर मी म्हणालो की ‘आता सर्व प्रक्रिया झाली आहे. तुला काही घरी सांगायचे आहे?’ यावर त्याने एक चिठ्ठी लिहिली, असे सुनील गुप्ता यांनी सांगितले.
AI नौदलासाठी वरदान! युद्धप्रसंगी कोणतं शस्त्र वापरायचं याची माहिती देणार
त्यात त्याने म्हटले की ‘देवाची इच्छा होती ते होत आहे. देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी जात आहे. मुलाला चांगले शिक्षण दे आणि तिथं सर्वांना सांग की शांती कायम ठेवा.’ त्यानंतर तो म्हणाला की ‘मला जेव्हा फाशी दिली जाईल त्यावेळी मी शेवटपर्यंत तुमच्या डोळ्यात बघत राहावं. वाटलं तर ही माझी शेवटची इच्छा समजा.’ त्यावर मी म्हटलं की ‘फाशी देताना तुझ्या चेहऱ्यावर काळा कपडा टाकला जाईल.’ तो म्हणाला की ‘फाशीच्या दोरीपर्यंत जाताना तुमच्या डोळ्यात बघतो.’ त्यावर मी होकार दिला, असे सुनील गुप्ता यांनी सांगितले.
त्यानंतर तो म्हणाला की ‘तुम्हाला एक गाणं ऐकवायचं आहे. मला फाशी यासाठी मिळत आहे की मी लोकांचे भले करत होतो.’ त्यानंतर त्याने तो संजय कपूर यांच्या बादल चित्रपटाचे गाणे गायला लागला. ‘अपने लिए जिये तो क्या जिये’ हे गाणे म्हणत होता. त्याच्यासोबत आम्ही देखील गाणे गायले, असे सुनील गुप्ता यांनी सांगितले.
Ranveer Singh: ‘रॉकी और रानी…’ सिनेमातील रणवीरच्या हॉट-डॅशिंग लूकचा Video Viral
माझ्या करिअरमधील हा पहिला कैदी होता. आतापर्यंत जेवढ्या फाशी बघितल्या होत्या त्यामध्ये कैदी नेहमी रडतो किंवा मी गुन्हा केला नाही असे म्हणतो. पण हा पहिला कैदी होता की हसत हसत म्हणत होता की आपल्यासाठी जगू नये तर दुसऱ्यासाठी जगावं. हा मेसेज तो देत होता. त्यानंतर त्याला फाशीपर्यंत घेऊन गेले. फाशीच्या दोरीपर्यंत जाऊपर्यंत तो माझ्याकडे बघत होता. फाशी दिल्यानंतर डॉक्टरांनी येऊन चेक केले. तो मृत झाल्याचे घोषीत केले, असे सुनील गुप्ता यांनी सांगितले.
त्यानंतर त्याला जेलमध्ये दफन करायचे होते. त्याच्या गुरुला देखील तिथंच फाशीगारामध्ये दफन केले होते. त्याच्या शेजारीचं अफजलला दफन केले. त्यानंतर मी घरी गेल्यानंतर मला तो बोलल्याचे आठवत होते की ‘तुमच्या डोळ्यात कंन्फेशन दिसत आहे.’ जेलरदेखील एक माणूस असतो. माझे मन देखील भरुन आले होते. त्यानंतर माझ्या मुली जवळ घेऊन मी बराच वेळ रडलो, असे सुनील गुप्ता यांनी सांगितले.