Ranveer Singh: ‘रॉकी और रानी…’ सिनेमातील रणवीरच्या हॉट-डॅशिंग लूकचा Video Viral

Ranveer Singh: ‘रॉकी और रानी…’ सिनेमातील रणवीरच्या हॉट-डॅशिंग लूकचा Video Viral

Ranveer Singh: अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani ) या सिनेमामुळे चांगलाच चर्चेत येत आहे. रणवीर या सिनेमात ‘रॉकी रंधावा’ हे पात्र साकारणार असलयाचे सांगितले जात आहे. नुकताच रणवीरच्या ‘रॉकी रंधावा’ पात्राची ओळख करून देणारा टीझर सोशल मीडियावर (Social media) जोरदार धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे. (Hot dashing look) अभिनेत्याचा फिटनेस आणि हॉट अंदाज बघून अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)


रणवीर सिंहने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘रॉकी रंधावाचे मंडे मोटिव्हेशन’ असे लिहिले आहे. संपूर्ण व्हिडीओत रणवीरचा हॉट, डॅशिंग लूक बघायला मिळत आहे. दरम्यान ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा सिनेमा येत्या २८ जुलैला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहेत. तसेच धर्मेंद्र, शबाना आझमी, जया बच्चन यांच्या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.

तसेच ‘रॉकी और रानी…’च्या निमित्ताने तब्बल ७ वर्षांनी करण जोहरने पुन्हा एकदा दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली असल्याचे दिसून येणार आहे. गेल्या एका वर्षांपासून करण जोहरच्या या अफलातून सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. दोन वर्षांपासून या सिनेमाची घोषणा झाली होती.त्यानंतर या सिनेमाचा टीझरही प्रदर्शित झाला होता. त्याच्या टीझरलाही प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळला होता. त्यानंतर अरिजीत सिंगच्या आवाजातील ‘तू क्या मिले’ हे गाणंही सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. त्यामुळे या सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली असून आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे की कधी एकदा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

धर्मवादावरुन Ashutosh Rana यांची परखड भूमिका; म्हणाले, “क्या खुदा ने मंदिर तोडा…”

करण जोहरच्या करिअरला यावर्षी २५ वर्षे पुर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं हा पिक्चर करण जोहरसाठी खास आहे. त्यामुळे करण जोहरच्या फॅन्सना या चित्रपटाची विशेष उत्सुकता लागून राहिली आहे. परिवारात असणारे अनेक हवेदावे, प्रेम, भांडणं, विनोद, मजामस्ती, संघर्ष, दुश्मनी या सर्वांचे दर्शन या काही मिनिटांच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते आहे. त्याचसोबत आलिया आणि रणवीर सिंगचा रोमॅण्टिक अंदाज पाहायला मिळतो आहे. डान्स, ड्रामा, बिनधास्त डायलॉग्ज, गाणी, रोमान्स आणि रिलेशनशिप, प्रेम याचा संगमही या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

आलिया आणि रणवीर सिंग म्हणजेच रॉकी आणि रानी हे दोघंही 3 महिने एकमेकांच्या घरी आपल्या परिवाराला समजून घेण्यासाठी राहण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे या चित्रपटाला एक वेगळाच ट्विस्ट मिळाला आहे. आता यामुळे नक्की काय काय या चित्रपटातून पाहायला मिळेल याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube