EPF New Rule : ऑक्टोबर 2026 पासून EPF म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे काही नियम बदलणार आहे. केंद्र सरकार वेतनाची कमाल मर्यादा (Wage Ceiling) 15,000 वरून वाढवून 25,000 करत आहे. या एका बदलामुळे तुमच्या PF खात्यात नियोक्त्याचे (Employer) योगदान कसे जमा केले जाईल याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
काय बदल होणार?
पूर्वीच्या नियमांनुसार (जे सप्टेंबर 2014 नंतर लागू झाले होते), ज्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 15, हजारपेक्षा जास्त होता आणि ज्यांनी सप्टेंबर 2014 नंतर नोकरी सुरू केली होती, त्यांना EPS (पेन्शन योजना) मध्ये अनिवार्यपणे समाविष्ट केले जात नव्हते. त्यामुळे कर्मचाऱ्याचा 12% वाटा आणि नियोक्त्याचा 12% वाटा पूर्णपणे केवळ EPF खात्यात (PF फंडात) जमा केला जात असे. मात्र, ऑक्टोबर 2026 पासून एक नवीन नियम लागू होत आहे. वेतनाची कमाल मर्यादा आता 25 हजारपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे, जर तुमचा मूळ पगार 25 हजारपर्यंत असेल, तर तुम्हाला EPS (पेन्शन योजना) मध्ये अनिवार्यपणे सहभागी व्हावे लागेल.
20,000 बेसिक सॅलरीसाठी PF आणि EPS चे नवीन हिशोब
जर तुम्हाला बेसिक सॅलरी 20 हजार असेल, तर ऑक्टोबर 2026 पासून तुमच्या PF आणि EPS मधील मासिक योगदान जाणून घ्या. तुमच्या पगारातून कापली जाणारी रक्कम तीच राहील तुमच्या पगाराच्या 12%, म्हणजेच 2,400 यात कोणताही बदल नाही. मात्र, कंपनीच्या योगदानाच्या बाबतीत जे यापूर्वी पूर्णपणे (2,400) तुमच्या EPF खात्यात जात असे आता त्यातील 1,666 तुमच्या पेन्शनसाठी वळवले जातील आणि उर्वरित 734 तुमच्या EPF खात्यात जमा केले जातील. कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी (EPS) स्वतःच्या खिशातून वेगळे योगदान देण्याची गरज नाही. ही रक्कम पूर्णपणे कंपनीच्या किंवा नियोक्त्याच्या 12% योगदानातून वळती केली जाते.
सप्टेंबर 2026 या महिन्याबाबत काय होईल?
हा बदल महिन्याच्या मध्यात लागू होत असल्याने, ECR (इलेक्ट्रॉनिक चलन-कम-रिटर्न) गणनेच्या उद्देशाने सप्टेंबर 2026 चे दोन भाग केले जातील
पहिला भाग: 1 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर (16दिवस)
दुसरा भाग: 17 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर (14 दिवस)
तहसिलदाराची दुष्काळाच्या बैठकीला दांडी…जिल्हाधिकाऱ्यांनी थेट घरचा रस्ता दाखवला!
त्यानंतर 1 ऑक्टोबर 2026 पासून 25000 रुपयांच्या नवीन वेतन मर्यादेनुसार EPF आणि EPS कपाती लागू केल्या जातील. या बदलामुळे तुमच्या EPF खात्यात जमा होणारी मासिक रक्कम कदाचित थोडी कमी होऊ शकते, परंतु तुम्हाला पेन्शनचे (EPS) सुरक्षा कवच मिळते, जे निवृत्तीनंतर तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत मोलाचे ठरेल.
