Download App

नरेंद्र मोदींवर टीका करताना विचारपूर्वक बोला, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना निर्देश

Loksabha Election 2024 :लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) विचारपूर्वक विधान करावं, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयोगाने राहुल गांधींना वक्तव्य करताना अधिक सावधान आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आला आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात भाषण करताना पाकिटमार आणि पनौती असे शब्द वापरले होते. हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचल्यावर न्यायालयाने निवडणूक आयोगाला यावर कारवाई करण्यास सांगितले होते. याबाबत भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती, त्याची दखल घेत आयोगाने 23 नोव्हेंबर 2023 रोजी राहुल गांधींना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

जागा वाटपाच्या तहात शिंदे फसले… 23 जागा कायम ठेवत ‘ठाकरेंनी’ दाखवली सुपर पॉवर…

यासोबतच, गेल्या वर्षी डिसेंबरच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, निवडणूक आयोगाने राहुल गांधींना निवडणूक प्रचारादरम्यान स्टार प्रचारक आणि राजकीय नेत्यांसाठी जारी केलेल्या सूचनांचे योग्य पालन करण्यास सांगितले आहे.

Loksabha elections : शिवानी वडेट्टीवार लोकसभा लढणार? कॉंग्रेसकडे केली तिकीटाची मागणी

या वर्षी 1 मार्च रोजी जारी केलेल्या ॲडव्हायझरीमध्ये, निवडणूक आयोगाने असा इशारा दिला होता की, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास, पक्ष, उमेदवार आणि स्टार प्रचारकांना केवळ माफी मागण्याऐवजी कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. यापूर्वी नोटिसा मिळालेल्या स्टार प्रचारक आणि उमेदवारांनी पुन्हा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही त्यात म्हटले आहे.

follow us