जागा वाटपाच्या तहात शिंदे फसले… 23 जागा कायम ठेवत ‘ठाकरेंनी’ दाखवली सुपर पॉवर…

जागा वाटपाच्या तहात शिंदे फसले… 23 जागा कायम ठेवत ‘ठाकरेंनी’ दाखवली सुपर पॉवर…

मुंबई : भाजप-शिवसेना युतीतील शिवसेनेच्या (Shiv Sena) कोट्यातील पारंपारिक आठ जागा भाजपच्या तर चार जागा राष्ट्रवादीच्या (NCP) वाट्याला आणि भाजपच्या (BJP) कोट्यातील एक जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यानुसार भाजप 32, शिवसेना 11 आणि राष्ट्रवादी पाच अशा जागा लढविणार असल्याचे सांगितले जात आहे. या फॉर्म्युल्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना जवळपास 12 जागा कमी लढवणार आहे. तर भाजप नियमित जागांपेक्षा सात जागा अतिरिक्त लढवणार आहे. (upcoming Lok Sabha elections, BJP will contest on 32 seats, Shiv Sena on 11 seats and NCP on five seats, while Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) party will contest on 23 seats, Congress on 15 seats and NCP (Sharad Chandra Pawar) on 10 seats)

जितक्या जागा शिंदेंना, तितक्याच राष्ट्रवादीलाही द्या; भुजबळांच्या वक्तव्याने जागावाटपात ट्विस्ट!

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी, शिरुर, सातारा, रायगड या शिवसेनेच्या कोट्यातील चार आणि बारामती ही भाजपच्या कोट्यातील एक अशा पाच जागा राष्ट्रवादीला देण्याची तयारी भाजपने केली आहे. तर शिवसेनेच्या कोट्यातील मुंबई दक्षिण, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, पालघर, हिंगोली, अमरावती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिक या आठ जागांवर भाजपने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे भाजप 32 जागांवर निवडणूक लढणार असल्याचे जवळपास अंतिम मानले जात आहे. याबाबत उद्या (7 फेब्रुवारी) अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

ठाकरेंनी दाखविली सुपर पॉवर :

त्याचवेळी महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी सुपर पॉवर दाखविली आहे. आमदार सोडून गेले, खासदार सोडून गेले, काँग्रेस अन् पवारांएवढी ताकद असतानाही ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात 23 जागा मिळविल्या आहेत. ज्या जागा आतापर्यंत शिवसेना लढवत आहे, त्यातील काही जागांवर काँग्रेस अन् पवार यांच्यासोबत अदलाबदली होणार असली तरीही भाजप-शिवसेना युतीत जेवढ्या जागा शिवसेना लढवत होती, तेवढ्याच जागा महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वाट्याला येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

शिवसेनेच्या कोट्यातील आठ जागा भाजपला अन् चार राष्ट्रवादीला? ’32’ मतदारसंघात ‘कमळाचे’ उमेदवार

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष 23, काँग्रेस 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष 10 जागांवर निवडणूक लढविणार आहे. तर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे. यातील एक अकोल्याची जागा काँग्रेसच्या खात्यातून दिली जाणार आहे. तर अन्य दोन जागा कोणत्या असणार यावर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. या दोन्ही जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) देणार की एक जागा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कोट्यातून दिली जाण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube