अतिक अहमदच्या हत्येपूर्वी जया पाल म्हणाल्या होत्या…

जसं माझ्या पतीला मारलं तसंच त्याचीही हत्या व्हावी, अशी मागणी उमेश पाल यांची पत्नी जया पाल यांनी प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं होते. जया पाल यांचं हे वक्तव्य अतिक अहमदच्या हत्येपूर्वी 48 तासांआधीच सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. आता अतिक अहमदच्या हत्येनंतर जया पाल यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अजितदादांना व्हायचंय मुख्यमंत्री; दिल्लीत […]

Atiq Ahmed

Atiq Ahmed

जसं माझ्या पतीला मारलं तसंच त्याचीही हत्या व्हावी, अशी मागणी उमेश पाल यांची पत्नी जया पाल यांनी प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं होते. जया पाल यांचं हे वक्तव्य अतिक अहमदच्या हत्येपूर्वी 48 तासांआधीच सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. आता अतिक अहमदच्या हत्येनंतर जया पाल यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

अजितदादांना व्हायचंय मुख्यमंत्री; दिल्लीत लावली फिल्डिंग, पुण्यातले कार्यक्रम पुन्हा अचानक रद्द

उत्तर प्रदेशातला माफिया गुंड अतिक अहमदसह त्याचा भाऊ अशरफच्या हत्येने देशभरात एकच खळबळ उडाली. त्याआधीच अतिकचा मुलगा असद, गुड्डू मुस्लिम, गुलाम, अरबाज विजय उर्फ उस्मान चौधरी हे 24 फेब्रवारी रोजी उमेश पाल यांच्या झालेल्या हत्येप्रकरणी सीसीटिव्हीमध्ये कैद झाल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांकडून अतिक अहमदत्या गॅंगविरोधात ठोस कारवाईची भूमिका घेतल्याचं दिसलं.

दुबईतील इमारतीला भीषण आग, 4 भारतीयांसह 16 जणांचा मृत्यू

उमेश पाल यांच्या हत्येचा आरोप अतिक आणि त्याच्या साथीदारांवर ठेवण्यात आला, त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच जया पाल यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या पतीची हत्या करण्यात आली, त्याच पद्धतीने अतीकलाही मारण्यात यावे, असं म्हंटलं होतं. त्यानंतरच अतिक आणि अशरफची हत्या झाली आहे.

Heat Stroke : श्रीसदस्यांची विचारपूससाठी राज ठाकरे एमजीएम रुग्णालयात जाणार

अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची गोळ्या झाडून निर्घूण हत्या करण्यात आली आहे. अतिक अहमद आणि भाऊ अशरफच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर झाल्याने खळबळ माजलीय.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडून सुरु असलेल्या कारवाईबद्दल त्यांचे मी आभारी असून माझे पती आणि दोन सुरक्षा रक्षकांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली त्याच पद्धतीने त्यांनाही मारण्यात यावे, एवढीच माझी मागणी असल्याचं जया पाल म्हणाल्या होत्या.

Exit mobile version