Download App

Biparjoy Cyclone अगोदर भारताला धडकली ‘ही’ 5 मोठी चक्रीवादळं; अनेकांचा घेतला जीव!

Biparjoy Cyclone : अरबी समुद्रावरील बिपरजॉय (Biparjoy Cyclone ) चक्रीवादळाचे तीव्र चक्री वादळात रूपांतर झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या मते, ठाणे, रायगड, मुंबई आणि पालघर जिल्ह्यांतील काही भागात 45-55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. यासोबतच हलक्या पावसाचीही शक्यता आहे. अरबी समुद्रात घोंगावत असलेलं बिपरजॉय चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केलं असून ते हळूहळू गुजरातकडे सरकतंय. हे वादळ भीषण रुप धारण करत असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ( Before Biparjoy Cyclone India Face 5 Danger Cyclone many peoples dead )

Shambhuraj Desai : ‘रोहित पवारांनी डायग्नॉस्टिक सेंटर काढले आहे का’?

दरम्यान, उद्या 15 जून रोजी बिपरजॉय चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मात्र भारताच्या किनारपट्टीच्या भागांना धकणारं बिपरजॉय हे एकच असं भयावह चक्रवादळ नाही. या अगोदर देखील अशा प्रकारच्या 5 मोठ्या आणि रौद्र चक्रीवादळांनी देशात अनेकांचा जीव घेतला आहे. संपत्तीच नुकसान झालं आहे.

कोण-कोणती आहेत ही चक्रीवादळं पाहूयात…

1. 1999 मध्ये ओडीसामध्ये आलेले ओ-5बी चक्रीवादळ :
29 ऑक्टोबर 1999 ला ओ-5बी हे रौद्र चक्रिवादळ ओडीसाच्या किनारपट्टीला धडकले होते. या वादळाने मोठं नुकसान झालं होत. तब्बल 10 हजार लोकांचा या वादळात मृत्यू झाला. लाखो लोक बेघर झाले होते. आकडेवारी सांगायची झाली तर या वादळाने तब्बल 4.44 अरब डॉलर एवढं नुकसान झालं होतं. या वादळाचा वेग 400 किमी प्रति तास एवढा होता. यामुळे समुद्रात 6 ते 7 मीटर उंच लाटा निर्माण झाल्या होत्या.

जाहिरात आली, मुख्यमंत्र्यांना भेटलो पण, त्यांनी मला.. महाजनांनी सगळा घटनाक्रमच सांगितला

2. 1998 मध्ये गुजरातमध्ये आलेले चक्रीवादळ :
4 जून 1998 ला गुजरातमध्ये देखील असेच एक मोठे चक्रीवादळ आले होते. कांडला बंदरावर हे वादळ धडकलं होतं. यामध्ये गुजरातमध्ये हजार लोकांचा तर देशभरात या वादळात तब्बल 10 हजार लोकांचा मृत्यू झाला. तर यामुळे 10 हजार कोटी रूपायांचे नुकसान झाले होते. यामध्ये 165 किमी प्रति तास असा वाऱ्याचा वेग होता. कच्छ प्रदेशातील लोक या वादळाचं नाव घेतल्यास आजही घाबरतात.

3. 1977 मध्ये गुजरातमध्ये आलेले चक्रीवादळ :
देशात 70 च्या दशकात ओडीसा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला असेच एक मोठे चक्रीवादळ धडकले होते. या वादळाचा वेग 193 किमी प्रति तास एवढा होता. या वादळात तब्बल 10 हजार लोकांचा मृत्यू झाला. हे वादळ इतकं रौद्र होतं की, ओडीसा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकलेल्या या वादळाचा परिणाम छत्तीसगडमध्ये देखील झाला होता. तर यामुळे 350 कोटी रूपायांचे नुकसान झाले होते.

4. 1971 ला ओडीसाच्या किनारपट्टीला धडकलेले चक्रीवादळ :
26-30 ऑक्टोबर 1971 ला एक रौद्र चक्रिवादळ ओडीसाच्या किनारपट्टीला धडकले होते. या वादळाचा वेग 150 ते 170 किमी प्रति तास एवढा होता. या वादळात देखील तब्बल 10 हजार लोकांचा या वादळात मृत्यू झाला. 10 लाखाहून अधिक लोक बेघर झाले होते. तर 50 हजार गुरांचा देखील मृत्यू या वादळात झाला होता. 8 लाखाहून अधिक घरं कोसळली होती.

4. 2021 ला गुजरातला धडकलेलं तौकते चक्रीवादळ :
मे 2021 मध्ये तौकते हे चक्रीवादळ गुजरातच्या दक्षिण किनाऱ्याला धडकले होते. तर 1998 मध्ये आलेल्या मोठ्या वादळानंतर हे वादळ देखील तितकेच भयावह होते. यामध्ये 170 लोकांचा मृत्यू झाला होता. 20 लाखाहून अधिका लोकांना रेस्क्यूमध्ये सुखरूख बाहेर काढण्यात आलं. यात देखील गुरं आणि जंगली प्राण्याचा मृत्यू झाला होता. यामध्ये 125 किमी प्रति तास असा वाऱ्याचा वेग होता. 40 हजार झाडं कोसळली होती.

Tags

follow us