जाहिरात आली, मुख्यमंत्र्यांना भेटलो पण, त्यांनी मला.. महाजनांनी सगळा घटनाक्रमच सांगितला

जाहिरात आली, मुख्यमंत्र्यांना भेटलो पण, त्यांनी मला.. महाजनांनी सगळा घटनाक्रमच सांगितला

Girish Mahajan on Shivsena Advertisement : देशात मोदी महाराष्ट्रात शिंदे या शिंदे गटाच्या एकाच जाहिरातीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. जाहिरातीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाच वगळण्यात आल्याने भाजपचे नेते कमालीचे नाराज झाले. त्यानंतर चूक लक्षात येताच आज फडणवीस यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात देण्यात आली. मात्र, अजूनही जुन्याच जाहिरातीची चर्चा सुरू आहे. ही जाहिरात कुणी दिली, असे प्रश्न विरोधी पक्षाकडून विचारले जात आहेत. सत्ताधाऱ्यांकडून मात्र उत्तर देण्याऐवजी जबाबदारी झटकण्याचे काम केले. यानंतर आता मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी या जाहिरातीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काय चर्चा झाली, याची माहिती दिली आहे.

महाजन म्हणाले, काल जी जाहिरात आली ती नकळत आली होती असे म्हणायला हरकत नाही. माझी मुख्यमंत्र्याशी यासंदर्भात चर्चा झाली. त्यांनीही हाच प्रश्न उपस्थित केला की ही जाहिरात आली कुठून त्यांचाही हाच प्रश्न होता. पण, कुठेतरी ती कार्यकर्त्याकडून न कळत दिली गेलेली जाहिरात होती. त्यावरून युतीत दुफळी आहे मतमतांतर आहे असे म्हणण्याचे आजिबात काही कारण नाही. आगामी निवडणुका आम्ही एकत्रच लढणार आहोत.

कॅबिनेट दर्जा मिळूनही बच्चू कडू नाराजचं; थेट मंत्रालयातून करणार शिंदे-फडणवीसांची कोंडी

मी मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर आहे मला सगळ्यांच्या आरोग्याची काळजी आहे. त्यामुळे हे खरे आहे की सतत प्रवास करून देवेंद्र फडणवीस यांच्या कानात दुखत आहे. त्यामुळे त्यांनी प्रवास करू नये अशा सूचना डॉक्टरांच्या होत्या. त्यामुळे उपमुख्यमंत्री कोल्हापुरला गेले नाहीत हे त्यामागचे खरे कारण आहे. पण जाहिरात आल्यामुळे गेले नाहीत किंवा दुसऱ्या कोणत्या कारणाने गेलेले नाहीत असे काही नाही.

सरकारचे आरोग्य ठणठणीत

आजची जाहिरात चांगली आलेली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनीच ही जाहिरात दिली आहे त्यामुळे त्यांचे फोटो येतील. सरकारचे आरोग्य एकदम ठणठणीत आहे. त्यामुळे एखाद्या बातमीने किंवा जाहिरातीने कुठे आरोग्य बिघडेल, डोकं दुखेल, ताप येईल असं म्हणण्याचे कारण नाही.

काँग्रेसने एखादाच खासदार निवडून आणावा

काँग्रेसकडून भाजपमुक्त महाराष्ट्र करण्याची वक्तव्ये केली जात आहेत. यावर महाजन यांनी काँग्रेसला थेट आव्हान दिले. मला वाटतं सध्या काँग्रेसची काय अवस्था आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. राज्यामध्ये काय आणि देशात काय याची आपल्याला कल्पना आहे. म्हणून काँग्रेसने या गप्पाच करू नयेत. येणाऱ्या निवडणुकात त्यांनी आपली कामगिरी दाखवावी. महापालिका, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यांनी एखाद दुसरा तरी खासदार निवडून आणावा असे माझे त्यांना आव्हान आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube