Bengaluru Traffic Helps Groom Ditch Newly-Wed Bride : वाढत्या वाहतूक समस्येमुळे करोडो नागरिक त्रासले आहेत. त्यात देशातील प्रमुख शहरे जसे की, दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू या शहरांमधील वाहतुकीची समस्या अतिशय गंभीर अशी आहे. बंगळुरू येथील वाहतूक कोंडीची चर्चा तर सर्वदूर होते. दिवसागणिक येथील वाहतुकीचा प्रश्न अतिशय बिकट होत चालला आहे. याच वाहतूक कोंडीचा फायदा घेत नवविवाहित नवरदेवानं पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ही घटना 16 फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथील महादेवपुरा टेक कॉरिडोअर येथे घडली. यानंतर नववधूने काही अंतर पतीचा पाठलाग केला मात्र, पती पळून जाण्यात यशस्वी झाला.
याबाबत प्रकाशित वृत्तानुसार या नवदाम्पत्यानं 15 फेब्रुवारी रोजी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघेही चर्चमधून परतत होते. त्यावेळी शहरातील महादेवपुरा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी नवरदेवानं कारचा दरवाजा उघडून पळ काढला. त्यानंतर वनवधूनं काही अंतर त्याचा पाठलाग केला.
यानंतर आपला पती परत येईल या विश्वासावर नववधूने जवळपास 15 दिवस वाट पाहिली मात्र, तो परतला नाही. त्यामुळे अखेर नववधूनं 5 मार्च रोजी पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगत तक्रार दाखल केली. यात तिने आपल्या नवऱ्याचे एका मुलीसोबत अफेअर असल्याचा दावा केला आहे. एवढेच नव्हे तर, संबंधित मुलीने तिच्याकडील आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. याच भीतीने नवऱ्याने पळ काढल्याचा दावा पत्नीनं केला आहे.
Mangal Prabhat Lodha : लव्ह जिहादची 1 लाख प्रकरणं, सरकार चालू अधिवेशनात विधेयक मांडणार
संबंधित वधूचा नवरा गोव्यात त्याच्या वडिलांच्या कंपनीत काम करतो. त्यावेळी त्याचे एका मुलीसोबत अफेअर होते. याबाबत मला कल्पना देण्यात आली होती. आपल्या नवऱ्याने संबंधित मुलीसोबतचे नाते संपुष्टात आणले होते. परंतु, त्यानंतर या मुलीने पतीला ब्लॅकमेल करण्यास सुरू केले. याच भीतीपोटी नवऱ्याने पळ काढल्याचे नववधूचे म्हणणे आहे.